ETV Bharat / bharat

Breaking News Live : भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे 8 माजी आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी दिल्लीत भेट घेणार - आजच्या लेटेस्ट न्यूज

maharashtra breaking news
मराठी लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Sep 18, 2022, 6:49 AM IST

Updated : Sep 18, 2022, 10:59 PM IST

22:58 September 18

भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे 8 माजी आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी दिल्लीत भेट घेणार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे 8 माजी आमदार आणि मी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार आहे.

18:53 September 18

शिवसेना नेते संजय राऊतांच्या जामीनावर अर्जावर उद्या सुनावणी; जेल की बेल ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळणार की कोठडी? याचा फैसला उद्या सोमवारी होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या राऊत यांची उद्या न्यायालयीन कोठडी संपणार आहे. तसेच राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर देखील सुनावणी होणार आहे.

17:52 September 18

पुण्यात काँग्रेस महानगरपालिका स्वबळावर लढणार; बैठकीत झाला निर्णय

पुण्यात काँग्रेस आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय आज ( रविवारी ) झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.

17:39 September 18

मुंद्रा बंदरावर 48 कोटी रुपयांची ई-सिगारेट जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सिगारेटची तस्करी रोखण्यासाठी DRI ऑपरेशन्सचा एक भाग म्हणून 16 सप्टेंबर रोजी मुंद्रा बंदरावर अंदाजे 48 कोटी रुपयांची ई-सिगारेट जप्त केली.

17:37 September 18

राष्ट्रपतींकडून एलिझाबेथ यांना श्रद्धांजली अर्पण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वेस्टमिन्स्टर हॉल लंडनला भेट दिली. राष्ट्रपतींनी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली अर्पण केली.

15:36 September 18

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आढळले मृत बिबट्याचे पिल्लू

मुंबई - गोरेगाव परिसरातील फिल्मसिटीमध्ये बिबट्याचा पिल्लू मृत अवस्थेत सापडले आहे. आरे पोलीस आणि राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी दिली आहे.

14:17 September 18

राजकीय भूमिका बदलली की ईडी मागे लागते; जयंत पाटलांचा टोला

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षाचे काम करत असून ते चांगले आहे असा टोला लगावला आहे. तसेच राजकीय भूमिका बदलली की ईडी मागे लागते, असा टोलाही जयंत पाटलांनी मारला.

13:33 September 18

हाफ मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सातारा : ११ व्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या एका धावपटूचा heart attack to National table tennis player हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू Table Tennis Player Death Satara झाला. कोल्हापूरच्या राज पटेल (वय ३२), National table tennis player Raj Patel death असे त्याचे नाव असून तो राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. या घटनेने कोल्हापुरातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

13:33 September 18

पुण्यात सात वर्षीय मुलाला शिक्षिकेची बेदम मारहाण; 'या' नामांकित शाळेतील प्रकार

पुणे : पुणे येथील विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. लोहगाव येथील वडगाव शिंदे रस्त्यावर भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे.

13:32 September 18

माओवाद्यांना मोठा धक्का.. ७०० समर्थकांनी केले आत्मसमर्पण, पुतळाही जाळला

मलकानगिरी ( ओडिशा ): ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवर असलेल्या विविध गावांतील सुमारे 700 सक्रिय माओवादी समर्थकांनी शनिवारी मलकानगिरी जिल्ह्यात पोलीस Odisha Police आणि बीएसएफसमोर Border Security Force आत्मसमर्पण केले, असे एका अधिकाऱ्याने Over 700 Maoist Supporters Surrender In Odisha सांगितले.

13:32 September 18

नालासोपाऱ्यात एटीएसने एका माओवाद्याला घेतले ताब्यात

मुंबई - महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने धनवी रामनगर नालासोपारा (पू) येथील एका चाळीवर छापा टाकला. यात झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक समिती सदस्य कारु हुलास यादव याला Maoist detained by ATS in Nalasopara ताब्यात घेतले. त्याच्या डोक्यावर १५ लाखांचे बक्षीस असून वैद्यकीय उपचारासाठी तो महाराष्ट्रात आला होता, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे.

13:32 September 18

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'विदर्भात' मोठी संधी; प्रकाश महाजनांचं वक्तव्य

नागपूर- विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप मोठी संधी (chance for Maharashtra Navnirman Sena in Vidarbha ) आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन (MNS leader Prakash Mahajan) यांनी केलेला आहे.

11:38 September 18

धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश नाही ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनगर समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याकरिता दाखल करण्यात आलेले याचिकेवर सुनावणी दरम्यान- राज्य सरकारच्यावतीने असे सांगण्यात आले (State Govt Information in High court) की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शविली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारचे हात बांधलेले आहे. त्यामुळे एसटीमध्ये समावेश करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.

11:30 September 18

जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षकाचे प्रकरण उघडकीस; जिल्ह्यातील 10 शिक्षकांवर ठपका

अमरावती : शिक्षण संस्थेला बनावट टीईटी प्रमाणपत्र ( Case of bogus TET certificate )देणाऱ्या एका शिक्षकाविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बनावट टीईटी प्रमाणपत्र घोटाळ्यामध्ये शिक्षकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्याचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण ठरले आहे.( bogus TET certificate holder in amravati district )

11:30 September 18

कर्जदारांनी केली 'या' बँकेची तब्बल 'इतक्या' कोटींची फसवणूक ; गृह कर्जासाठी बनावट कागदपत्र

अमरावती : गृहकर्ज मिळविण्यासाठी बनावट दस्तावेज देत सात जणांनी एचडीएफसी होम फायनान्सला तब्बल १ कोटी ८६ लाख रुपयांचा चुना (HDFC Bank Fraud in Amravati) लावला. कर्जाचे काही हप्ते थकल्याने हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी एचडीएफसी लिमिटेडचे संदीप अंबुलकर यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी त्या सात जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल (Fake Documents for Home Loan by Borrowers ) केले.

11:29 September 18

८ चित्ते भारतात आले मात्र, ८ वर्षात १६ कोटी नोकऱ्या का नाही आल्या? राहुल गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (केएनपी) नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, आठ चिते आले आहेत, पण 16 कोटी नोकऱ्या आठ वर्षात का आल्या नाहीत?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

11:29 September 18

मुंबईत आज ढगाळ वातावरण ; मध्यम पावसाची शक्यता

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस पाऊस पडत (Mumbai Rain Update) आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. दिवसभरात साधारण ते मध्यम पाऊस पडेल, अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली (possibility of moderate rain in Mumbai) आहे. दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

10:40 September 18

आता शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार वांद्रे - कुर्ला संकुलात; परवानगी मिळाली

मुंबई - दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये चालू असलेली रस्सीखेच आता संपुष्टात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी केलेला अर्ज एमएमआरडीएने स्वीकारला असून त्यांना वांद्रे - कुर्ला संकुलात परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते मैदान आरक्षित असल्याने तो अर्ज फेटाळण्यात आला आहे.

09:56 September 18

चंदीगड विद्यापीठातील 60 विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; 8 विद्यार्थीनींचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाब - चंदीगड विद्यापीठातील 60 विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. याती 8 विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, आत्महत्याचे प्रयत्न कोणीही केला नसल्याची माहिती मोहाली पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एका मुलीला अटक करण्यात आली आहे. सध्या या विद्यापीठात जोरदार आंदोलन सुरू आहे.

09:19 September 18

कोल्हापुरात लम्पी आजाराने एकाच दिवसात 7 जनावरांचा मृत्यू

लम्पीबाधित 7 जनावरांचा मृत्यू

5 गायी आणि 2 बैलांचा समावेश

कोल्हापूरात एकाच दिवशी 7 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू

जिल्ह्यात आत्तापर्यंत 65 जनावरांना लागण, त्यातील 22 जनावरे झाली बरी

09:11 September 18

149 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू

नंदुरबार - जिल्ह्यातल्या 149 ग्रामपंचायतींच्या मतदानाला आज सकाळपासुन सुरुवात झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील 75 आणि शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचाचयतींसाठी आज मतदान होत आहे. यातील 12 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत. 149 ग्रामपंचायतींच्या सरपंचा पदासाठी 506 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात उभे ठाकले आहेत. तर सदस्य पदासाठी 2949 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 2450 अधिकारी कर्मचारी आणि पोलीसांची नेमणुक करण्यात आली आहे.या मतदान प्रक्रीयेसाठी 462 मतदान केंद्र देखील तयार करण्यात आहे. सकाळ पासुन धिम्या गतीने मतदान प्रक्रीया सुरु असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात दिसुन आले.

09:06 September 18

राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात; मनपा निवडणुकीसाठी आखणार रणनिती

नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी राज ठाकरे यांचे विदर्भ एक्सप्रेसने नागपूरच्या रेल्वे स्थानकावर आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत मनसेचे नेते आणि पदाधिकारी आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नागपूरसह विदर्भातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. राज ठाकरे नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष केला.

08:38 September 18

राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनमध्ये दाखल

लंडन - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनमध्ये (India President Droupadi Murmu in London) आज सकाळी दाखल झाल्या आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार (Queen Elizabeth Funeral Monday) आहेत. सोमवारी राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी १२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तांना भेट देऊन शोक व्यक्त केला होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (President Droupadi Murmu attend Queen Elizabeth Funeral)

07:37 September 18

भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेटबाहेर काढण्यावरून दोन रहिवाशांत हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे : भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेटबाहेर काढण्यावरून दोन रहिवाशांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. आहे. कुत्र्यावरून हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले अन पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरु केला.

07:37 September 18

ओला दुष्काळ जाहीर करा; पद्मश्री राहीबाई यांची शासनाकडे मागणी

अकोले - तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या बहुसंख्य पिकांना अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील पिके हातातून जाताना दिसत आहे. शेतकरी पाण्यात वाहून गेलेली पिके डोळ्यासमोर बघतांना हवालदिल झालेला आहे. मोठ्या कष्टाने आणि श्रमाने उभे केलेली भात. नागली. वरई तसेच इतर खरिपातील पिके अत्यंत नाजूक परिस्थितीत आहेत संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व संकट शेतकऱ्यांवर उभे ठाकले आहे. भात शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पद्मश्री राहीबाई यांनी शासनाकडे केली आहे.

07:37 September 18

बोरीवलीत तरुणाचं तलवारीने 20 केक कापून वाढदिवस सेलिब्रेशन; एमएचबी पोलिसांनी केली करवाई

मुंबई : वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील बोरीवली परिसरात घडल्याचे समोर आले आहे. यप्रकरणी एमएचबी पोलिसांनी कारवाई केली आहे.

06:41 September 18

यवतमाळ अमरावती येथील आठ हजार विद्यार्थ्यांनी पाठवले गडकरींना पत्र.. मृत्यूच्या महामार्गातून सुटका करण्याची केली मागणी

यवतमाळ : यवतमाळ ते अमरावती रस्त्याची अवस्था फारच गंभीर व बिकट आहे. उमरी-यवतमाळ-नेर-अमरावती ते धारनी असा हा तीन राज्यांना जोडणारा राज्य महामार्ग आहे. मात्र अलीकडच्या काळात अमरावती ते यवतमाळ या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. राज्य सरकारकडे या रस्त्यासाठी निधी नसल्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करा असे साकडे अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शालेय विद्यार्थ्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे.

06:40 September 18

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त भरती घोटाळा; निवड यादीतील 188 पैकी 100 प्रकल्पग्रस्त बोगस

चंद्रपुर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रांत जमिनी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याऐवजी बोगस कागदपत्रे सादर करून अनेकांना नोकऱ्या देण्यात आल्या. सामाजीक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी हा घोटाळा समोर आणला. मात्र त्यांच्यावर एका अधिकाऱ्याने तब्बल 25 कोटी मानहानीचा दावा ठोकला होता. मात्र प्रशासनाच्या कागदपत्रांच्या पडताळणीच्या चौकशीत 188 पैकी तब्बल 100 जणांचे कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बळीराज धोटे हेच संबंधित अधिकाऱ्याला कोर्टात खेचण्याचा तयारीत आहे.

06:40 September 18

पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या दोन ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार

नांदेड - जिल्ह्यातील ९१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु असून आज प्रत्यक्ष मतदान होणार आहे. पैकी सात ग्रामपंचायतींची निवडणूक सरपंचपदासह बिनविरोध झाली असून पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या दोन ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

06:34 September 18

maharashtra breaking news

अमरावती - जिल्ह्यातील बहिरम येथील आदिवासी अनुदानित पंचशील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शिळी खिचडी खाल्याने विषबाधा झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.

Last Updated : Sep 18, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.