ETV Bharat / bharat

Breaking News Live : मुंबईत गोवरची साथ; ५८५ संशयित रुग्ण, ७ लाख घरांचे सर्व्हेक्षण

MAHARASHTRA BREAKING NEWS AND UPDATE
दिवसभरातील ताज्या घडामोडींची सर्वात जलद अपडेट, पहा ईटीव्ही भारतचे लाईव्ह पेज
author img

By

Published : Nov 11, 2022, 6:44 AM IST

Updated : Nov 11, 2022, 9:44 PM IST

21:39 November 11

मुंबईत गोवरची साथ; ५८५ संशयित रुग्ण, ७ लाख घरांचे सर्व्हेक्षण

मुंबई - मुंबईमध्ये झोपडपट्टी विभागात मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत १०९ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ७ लाख ३५ हजार २५४ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात ५८४ संशयित रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण गोवंडी या विभागात आढळून येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

21:38 November 11

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडू नये- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर..

बीड - अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच वीज वितरण कंपनीकडून थकीत वीज बिलामुळे वीज कनेक्शन तोडले जात आहेत त्यामुळे सध्या असलेल्या पिकांना पाणी देण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडू नये अशी विंनती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

21:37 November 11

कचरा रस्त्यावर जाळला प्रकरण, नागपूर मनपा आयुक्तांची सफाई कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

नागपूर - महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दोन महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्याची स्वच्छता केल्यानंतर गोळा झालेला कचरा हा कचरापेटीत न टाकता तो रस्त्यावर जाळल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

20:54 November 11

मुंबईत ४१ कोरोनाचे नवे रुग्ण, शून्य मृत्यू

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली आली आहे. आज ४१ नव्या रुग्णांची (41 NEW CORONA PATIENTS IN MUMBAI) तर, शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या अडीच वर्षात १६१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ३३१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. Mumbai Corona Update

20:54 November 11

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक दिली; तिघांचा जागीच मृत्यू

अमरावती : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत वरूड तालुक्यातील ( Accident in Warud taluka ) अमडापूर येथील रहिवासी असलेल्या तिघांचा दुर्दैवी मूत्यू ( 3 people died in a terrible accident on a two-wheeler ) झाला आहे. या अपघातात दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात हा भीषण अपघात झाला. शेंदूर्जनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील पांढूर्णा ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील पुसला नजिक पंढरी ते महेंद्रीच्या जंगला दरम्यान हा अपघात घडला आहे.

20:54 November 11

पेणजवळ सात डमी बॉम्ब निकामी

पेण-रायगड मुंबई-गोवा महामार्गावरील पेणजवळ भोगावती पुलाच्याखाली संशयास्पद आढळून आलेल्या जिलेटीन कांड्यासारखी दिसणारी ती वस्तू ही डमी बॉम्ब ( Dummy bomb near Penan ) असल्याचे निष्पन्न झालं असून सुमारे सात तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी ( Dummy Bomb Failure ) करण्यात आला. गोवा हायवेवरील पेणनजीक भोगावती पुलाच्याखाली संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब ( Dummy bomb ) असल्याचे निष्पन्न झालं आहे.

19:49 November 11

NITI आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'मित्रा'ची स्थापना

मुंबई - महाराष्ट्र सरकारने NITI आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन - मित्राची स्थापना केली आहे. मित्राचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री मित्राचे सह-अध्यक्ष असतील. याबाबतचा सरकारी आदेश काढण्यात आला आहे.

19:33 November 11

अफझलखान सय्यद बंडा या दोघांच्या कबरी झाल्या मोकळ्या

सातारा - प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमाणावर सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. बुलडोझर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. अफझलखान व सय्यद बंडा या दोघांच्या कबरी मोकळ्या झाल्या आहेत. अत्यंत गोपनीयता बाळगत प्रशासनाने ही कारवाई केली आहे. सध्या प्रतापगड परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच, कबर परिसराकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतापगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

19:17 November 11

मुंबईत आज कोरोनाच्या ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही

मुंबई - मुंबईत कोरोनाच्या आज ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत ११ नोव्हेंबरला ४०४७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४१ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५४ हजार ६०७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३४ हजार ५३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १६०९२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे.

18:47 November 11

दोन प्रौढ मुलींना एकत्र राहण्याचा अधिकार - मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल

जबलपूर (मध्यप्रदेश) - खमरिया भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीची २२ वर्षीय तरुणीशी मैत्री झाली. दोघीही लहानपणापासून एकत्र राहत होत्या. एकत्र अभ्यास केला आणि वाढल्या. दोघीही एकमेकांच्या सुख-दुःखाच्या सोबती झाल्या. कालांतराने दोघीही भावनिकदृष्ट्या इतक्या जोडल्या गेल्या की आता त्या वेगळे राहायला तयार नाहीत. सध्या एका मुलीचे वय 18 आणि दुसरीचे 22 वर्षे आहे. घरच्यांना याची माहिती मिळताच दोघीही घरातून पळून गेल्या. यावर दोन प्रौढ मुलींना स्वतःच्या इच्छेने एकत्र राहायचे असेल, तर न्यायालयही त्यांना रोखू शकत नाही. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवी मलीमथ आणि न्यायमूर्ती विशाल मिश्रा यांच्या खंडपीठाने हेबियस कॉर्पस याचिकेवर निकाल देताना या दोन प्रौढ मुलींना एकत्र राहण्याची परवानगी दिली. मुलीने न्यायालयासमोर तिच्या मैत्रिणीसोबत राहण्याची परवानगी मागितली होती.

18:31 November 11

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 17-18 नोव्हेंबरला राज्यात ऊस तोड बंद आंदोलन

कोल्हापूर - ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यात ऊस तोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. दोन टप्यात केलेला FRP चा कायदा सरकारने बदलावा. सरकारने एकरकमी FRP मिळण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात कायद्यात बदल करावा, या प्रमुख मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या आहेत. केंद्राने साखरेचा दर 3100 रूपयेवरून 3500 रुपये करावा अशीही एक मागणी आहे.

17:03 November 11

भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी

नांदेड - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यामध्ये आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. शिवसेनेने काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. आज आदित्य ठाकरे प्रत्यक्ष या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सामिल झाले आहेत.

16:56 November 11

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचे वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये शक्तीप्रदर्शन

ठाणे - जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचे वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये शक्तीप्रदर्शन. आव्हाड यांच्या समर्थनार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. आव्हाड यांना अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

16:25 November 11

संजय राऊत यांचा जामीन रद्द करणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला

मुंबई - प्रवीण राऊत यांचे वकील यांनी ईडीच्या अर्जात दिलेल्या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र ईडीतर्फे याचिकेत सुधारणा करून पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले. ए एस जी अनिल सिंह यांनी केली सुधारित अर्ज दाखल करण्याची मागणी. PMLA कोर्टाने जे निरीक्षण ऑर्डरमध्ये नोंदवले आहे ते अत्यंत चुकीचे असे अनिल सिंह यांनी सांगितले. ईडीच्या याचिकेवर 14 नोव्हेंबरपर्यंत ईडीने जामीन रद्द करण्याबाबतची याचिका दोन्ही प्रतिवादींना उपलब्ध करावी असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले. त्यावर आठवड्याभरात दोन्ही प्रतिवाद्यांनी उत्तर दाखल करण्याचे कोर्टाने निर्देश दिले. त्यावर 25 नोव्हेंबर पासून दुपारी 2:30 वाजता याचिकेवर नियमित सुनावणी होणार आहे.

15:56 November 11

आम्ही सर्वजण जेलमध्ये जायला तयार, आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे यांची उद्विग्न प्रतिक्रिया

मुंबई - दबाव कुठून येतोय? अटक कशासाठी? जितेंद्र आव्हाड मारामारी करताना दिसतायत का? अशा प्रश्नांचा भडिमार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आव्हाड यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, मी व्हिडीओ बघितला आहे. त्यामध्ये आव्हाड हाताची घडी घालून उभे आहेत. मग शांत बसले तरी गुन्हा होतो का? आम्ही सर्वजण जेलमध्ये जायला तयार अहोत आम्ही जेलभरो आंदोलन करायला तयार आहोत, असा इशाराही सुळे यांनी दिला.

15:18 November 11

हरहर महादेव मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात

ठाणे - विवियाना मॉलमधील हर हर महादेवच्या शोवेळी झालेल्या मारहाण प्रकरणांमध्ये जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी घेतले ताब्यात.

15:14 November 11

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा - महेश तपासे

मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा. त्यानंतरच त्यांनी बोलावे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बावनकुळे यांनी ठाकरे पवारांच्या नादाला लागल्याने वाट लागल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने वरील प्रतिक्रिया दिली आहे.

15:03 November 11

अनिल देशमुख यांच्या जामीनावर सुनावणीस न्यायमूर्ती डांगरेंचा नकार

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर सुनावणीस न्यायमूर्ती भारती डांगरेंचा नकार. अनिल देशमुख यांच्या जामीनावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. काही वैयक्तिक कारणास्तव सुनावणीस दिला नकार. देशमुख यांना दुस-या न्यायमूर्तींकडे दाद मागण्याचे निर्देश. इतर बेंचकडे काही वेळात करणार सुनावणीसाठी अर्ज.

14:54 November 11

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणे अयोग्य - काँग्रेस

नवी दिल्ली - राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश संपूर्णपणे अस्वीकार्य आणि पूर्णपणे चुकीचा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

14:40 November 11

देशात प्रचंड बरोजगारी असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी

नांदेड - विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. कन्हैया कुमार यांनी ही टीका केली आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. बेरोजगारी मोठी आहे आणि एकट्या अमित शाह यांच्या मुलाला नोकरी आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

14:11 November 11

पुण्यात आता मांजर पाळण्यासाठी देखील घ्यावा लागणार परवाना

पुणे - पुण्यात कुत्रे पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो. तसाच त्याच पद्धतीने आता घरात मांजर पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

14:00 November 11

कोल्हापुरात मिरवणूक काढलेली 21 लाखांची दुचाकी जळून खाक

कोल्हापूर - वाजत गाजत कोल्हापुरात मिरवणूक काढलेली 21 लाखांची दुचाकी गाडी जळून खाक. केवळ 15 दिवसांपूर्वी कोल्हापुरातील तरुणाने मिरवणूक काढून नव्या दुचाकी गाडीचे घरी स्वागत केले होते. ही गाडी जळाली आहे.

13:55 November 11

ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्यांचा जामिन सुप्रीम कोर्टाने केला रद्द

नवी दिल्ली - असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये एआयएमआयएम चे अध्यक्ष ओवेसी यांच्यावर गोळीबार झाला होता. न्यायमूर्ती एमआर शहा आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाने जामीन देताना कोणतेही कारण दिले नाही, असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नव्याने विचारासाठी उच्च न्यायालयात परत पाठवले. तसेच यातील आरोपी सचिन शर्मा आणि शुभम गुर्जर यांना एका आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.

13:40 November 11

दोन सख्ख्या भावांचा महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

धुळे - दोंडाईचा शहरातील शिवाजीनगर भागातील दोन सख्ख्या भावांनी एका महिलेवर बलात्कार केला होता. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून त्यांनी मार्च 2021 मध्ये हे कृत्य केले. महिलेच्या गुप्तांगाला या नराधमांनी सिगारेटचे चटकेही दिले होते. काल रात्री उशिरा संबंधित पीडित महिलेने याबाबतची तक्रार पोलिसात दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

13:21 November 11

राजीव गांधी हत्या प्रकरण - नलिनीसह सहा आरोपींच्या सुटकेचे निर्देश

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

12:14 November 11

अफजलखान कबर परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम कोर्टातील सुनावणीमुळे बंद

सातारा - अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होत असल्याने अतिक्रमण हटवण्याचे काम आज बंद ठेवण्यात आलेले आहे. मात्र, प्रतापगड परिसरातील बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

11:58 November 11

आक्रमक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच मृतदेह जाळला

पालघर - अतिक्रमण न हटवल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मृतदेह जाळण्यात आला आहे. पालघरमधील दांडी खाडी गावातील ही घटना आहे.

11:47 November 11

आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण आणि सुटका

नागपूर - कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना रात्री घडली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर कळमना पोलिसांनी अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीला अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली आहे.

07:43 November 11

खुनाचा गुन्हा मागे घे, म्हणत दोघांनी केला बंदुकीतून गोळीबार..

इंदापूर: यापूर्वी दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घे अन्यथा तुला संपवीन अशी धमकी देत कळंब येथे दोन जणांनी बंदकीतून गोळीबार केला आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा व शस्त्रास्त्रे प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

07:04 November 11

काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

जम्मू आणि काश्मीर: शोपियांच्या कपरेन भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि लष्कर कारवाई करत असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे.

06:27 November 11

Breaking News Live: रायगडच्या पेणमध्ये सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

रायगडमधील मुंबई गोवा महामार्गावरील भोगावती नदीपात्रामध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रायगड आणि नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. तर हाती आलेल्या जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Nov 11, 2022, 9:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.