ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील भाजपा आमदार आणि राजस्थान पोलिसांमध्ये हाणामारी

भाजपा आमदार कीर्तिकुमार(बंटी) भांगडिया आणि सीकर शहर पोलीस यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे. डीएसपी सिटी बीरेंद्र कुमार यांनी आमदार कीर्तिकुमार यांच्यासह पाच जणांना अटक केली. मात्र, जामिनानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

author img

By

Published : Feb 20, 2021, 7:19 PM IST

Updated : Feb 20, 2021, 7:55 PM IST

महाराष्ट्रातील भाजपा आमदार आणि राजस्थान पोलिसांमध्ये बाचाबाची

सीकर - चिमूरचे भाजपा आमदार कीर्तिकुमार(बंटी) भांगडिया आणि सीकर शहर पोलीस यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे. सीकरमधील पोलिसाने बस थांबवून कीर्तिकुमार यांच्या बस चालकाचा परवाना जप्त केल्यानंतर वाद वाढला. यावेळी डीएसपी सिटी बीरेंद्र कुमार यांनी आमदार कीर्तिकुमार यांच्यासह पाच जणांना अटक केली. मात्र, जामिनानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

कीर्तिकुमार(बंटी) भांगडिया हे कुटुंबासह बसने सालासर हनुमान दर्शनाला जात होते. दुपारी बाराच्या सुमारास बसचालक सीकरजवळ रस्ता भटकला आणि शहरात घुसला. शहरातील एसके हॉस्पिटलजवळ ट्रॅफिक महिला पोलीस कमला आणि हेड कॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनी बस थांबविली आणि 500 रुपयांचे चालान कापले. चालान कापल्यानंतर चालकाचा परवानाही ताब्यात घेण्यात आला. यावेळी बस चालक आणि शहर पोलीस यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी बस चालक परत न अल्याने आमदार बस खाली उतरले आणि स्व:ताची ओळख करून दिली. मात्र, त्याने वाद आणखीच वाढला आणि हाणामारी झाली.

घटनेची माहिती मिळताच डीएसपी सिटी बीरेंद्र कुमार शर्मा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसमधील 5 जणांना अटक केली. यात भाजपचे आमदार कीर्ति कुमार, त्यांचे वडिल नितेश भगडिया, श्रीकांत, अंकित भूतडा आणि सुशील कोठारी यांचा समावेश आहे.

पाचही जणांविरूद्ध शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. तसेच त्यांना पाच तास पोलीस स्थानकात ताटकाळत ठेवलं. त्यानंतर शांतता भंग प्रकरणी प्रत्येकाला जामीन देत त्यांची सुटका केली. दरम्यान, घटनेनंतर आमदार कीर्ति कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. दर्शनासाठी आलो आहोत. आम्हाला कोणताही वाद नको आहे, असे ते म्हणाले.

Last Updated : Feb 20, 2021, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.