ETV Bharat / bharat

महादेव अ‍ॅपचा मालक उप्पलला दुबईत पोलिसांनी घेतलं ताब्यात, मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला वेग येणार? - महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपचा मालक

Mahadev App Owner Ravi Uppal महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपचा मालक असलेल्या रवी उप्पलला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रवी उप्पलला लवकरच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.

Ravi Uppal detained in Dubai
Ravi Uppal detained in Dubai
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 8:43 AM IST

नवी दिल्ली Mahadev App Owner Ravi Uppal - महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या दोन मुख्य मालकांपैकी एक असलेल्या रवी उप्पलला स्थानिक पोलिसांनी दुबईत ताब्यात घेतलं आहे. ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रेड नोटीस जारी केली होती. या नोटीसनुसार स्थानिक पोलिसांनी कारवाई करत रवी उप्पलला ताब्यात घेतलं आहे.

  • रवी उप्पला ताबा घेण्याकरिता ईडीचे अधिकारी दुबईच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग झाल्याचा रवी उप्पलवर आरोप आहे. या प्रकरणी छत्तीसगड पोलीस, मुंबई पोलिसांसह ईडीकडून तपास करण्यात येत आहे.

तपासाला वेग येण्याची शक्यता- महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अभिनेता आणि उद्योगपतींची नावं असल्यानं या प्रकरणाकडं संपूर्ण देशाच लक्ष लागलेलं आहे. 15,000 कोटी रुपयांच्या महादेव सट्टेबाजी अ‍ॅप घोटाळ्यानं तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. तपास संस्थांची चौकशी सुरू असताना रवी उप्पल हा विदेशात लपून बसला होता. त्यामुळे तपास संस्थांना चौकशी करण्यात अडथळा येत होता. रवी उप्पलला भारतात आल्यानंतर तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

  • माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीनंतर मुंबईत रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यावर फसवणूक आणि जुगार अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपींना हवाला व्यवहारातून पैसे मिळाल्याचा संशय असल्यानं आरोपी हे ईडीच्या रडारवर आहेत.

मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू- महादेव सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणी प्रथम माटुंगा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची व्याप्ती आणि गुंतागुंत पाहता हे प्रकरण वर्ग करण्यात आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्यासह 30 हून अधिक संशयितांवर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी डाबरचे संचालक गौरव बर्मन आणि कंपनीचे अध्यक्ष मोहित यांच्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल केला.

रवी उप्पल दुबईत आहे स्थायिक- छत्तीसगड पोलिसांनी सौरभ चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल लुक आऊट सर्क्युलर नोटीस काढलेले आहे. रवी उप्पलला भारतात येताच अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पलनं मध्य प्रदेशातील दुर्ग भिलाईसह देशभरात विविध ठिकाणी ऑनलाईन सट्टेबाजीचा धंदा सुरू केला होता. बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या नावाखाली अवैध मार्गानं कमाई करून रवी उप्पल हा दुबईला स्थायिक झाला. तेथून त्यानं अनेक सेलिब्रिटींनांही आपल्या अवैध व्यवसायात धंद्यात सामील करून घेतलं.

हेही वाचा-

  1. हायप्रोफाईल आरोपी असलेल्या महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचा आता मुंबई गुन्हे शाखा करणार तपास
  2. Mahadev Book App Scam : महादेव अ‍ॅप प्रकरणी मुंबई पोलिसात पहिला गुन्हा; 15,000 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.