नवी दिल्ली - आईचे प्रेम आणि मातृत्वाला सर्वजण सलाम करतात. मग ती आई कोणतीही असो. प्रत्येक प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये वात्सल्याचा पाझर वाहत असतो. आपल्या बाळाच्या वाढीसाठी आई धडपडत असते. अंड्यात असलेल्या आपल्या पिलांना वाचवण्यासाठी वाचा नसलेल्या आईची धडपड एका व्हिडिओतून समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ 'माँ तुझे सलाम' असे म्हणत ट्विटरवर शेअर केला आहे.
-
Maa tujhe salaam… pic.twitter.com/BHLSzvDfHW
— anand mahindra (@anandmahindra) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maa tujhe salaam… pic.twitter.com/BHLSzvDfHW
— anand mahindra (@anandmahindra) April 19, 2022Maa tujhe salaam… pic.twitter.com/BHLSzvDfHW
— anand mahindra (@anandmahindra) April 19, 2022
हे फक्त मायचं करू शकते - एका मातीच्या ढिगावर पक्ष्याची अंडी आहे. पक्षी तिच्या पिलाजवळ जाते. मात्र हा ढिगारा उचलण्यासाठी एक जेसीबी जाते. पक्ष्याला लगेच धोका लक्षात येतो. मात्र ती तिच्या पिलांना त्या ढिगाऱ्यावरून उचलू शकत नाही. त्यामुळे ती केवळ चिव् चिव् करते. जेसीबी परत मागे सरकते. त्यानंतर तिची किलबिलाट शांत होते. परंतु परत जेसीबी अगदी अंड्यांपर्यंत जाते, तेव्हा ती पक्षी जोरात ओरडताना दिसते. मृत्यूच्या दारात असूनही ती आपल्या पिलांना सोडून पळ काढत नाही. शेवटी चालक तिथून निघून जातो आणि पक्षी आपल्या पिलांना सुरक्षित वाचवते.