ETV Bharat / bharat

Ludhiana Gas Leak : लुधियाना गॅस गळतीत कशामुळे झाला 11 जणांचा मृत्यू? 'हे' सत्य आले समोर

author img

By

Published : May 1, 2023, 10:14 AM IST

लुधियाना येथे गॅस लिक होऊन तब्बल 11 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासकीय अधिकारी गॅस कुठून आला याबाबत तपास करत आहेत.

Ludhiana Gas Leak
संपादित छायाचित्र

लुधियाना : गॅस लिक झाल्याने लुधियानात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गॅस लिक प्रकरणांचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. हायड्रोजन सल्फाइडचे प्रमाण वाढल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गॅसचा प्रभाव कमी करण्यासाठी कॉस्टिक सोडा वापरला जात असून दर तासाला सांडपाण्यात वायूचे प्रमाण मोजले जात आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा घटनास्थळावर ठिय्या : गॅस गळतीमुळे 11 जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागी झाले आहे. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. पुढील 24 तास गॅस गळती सांडपाण्यामुळे झाली की कारखाना मालकाच्या निष्काळजीपणामुळे होत आहे, याचे निरीक्षण करण्यात येणार आहे. गॅस लिक प्रकरणावर सतत लक्ष ठेवून असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे अधिकारी २४ तास गटारातून बाहेर पडणाऱ्या वायूची सतत तपासणी करत आहेत. अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून गॅस कधी कमी होतो आणि कधी वाढतो हे तपासले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सांडपाण्यात गॅस कसा बनला हा तपासणीचा विषय : एनडीआरएफच्या 2 तुकड्या गॅस लिक प्रकरणाच्या मदत कामात गुंतलेल्या आहेत. भटिंडा येथून एका पथकाला निमंत्रित करण्यात आले आहे. असे अनेकदा घडत नाही. सांडपाण्यात गॅस असतो, पण तो मोठ्या प्रमाणात गॅस कसा बनला, हा तपासाचा विषय एनडीआरएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ज्या घरात सर्व रहिवाशांचा मृत्यू झाला आहे, त्या घरात हवा बाहेर पडण्यासाठी खिडकी नाही. घरात भरपूर गॅस जमा झाला आहे, पण तो तपासणे खूप गरजेचे असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हायड्रोजन सल्फाइडमुळे मृत्यू : हायड्रोजन सल्फाइड वायूमुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आता हायड्रोजन सल्फाइड वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन कॉस्टिक सोडा वापरत आहे. लुधियाना प्रशासन सतत नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा घोषणा करत आहे. हा वायू कुठून येऊ लागला हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेने प्रशासन हादरले आहे. वायूंचे हे मिश्रण मानवी जीवनासाठी धोकादायक ठरले आहे.

मेंदूवर काय होतो वायूचा परिणाम : स्थानिक नागरिकांच्या मते, हायड्रोजन सल्फाइड वायू मेंदूला सुन्न करत होता. त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. सीवेजमधून गॅस गळती होते. या परिसरात जवळपास अनेक कारखानेही आहेत. हायड्रोजन सल्फाइड बहुतेक वेळा सांडपाण्यात आढळतो. मात्र तो मानवांसाठी हानिकारक ठरेल इतक्या प्रमाणात आढळत नाही. एनडीआरएफच्या पथकांकडून गॅस लिक प्रकरणांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे.

हेही वाचा - LPG Cylinder Price Today : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलासा, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती सुमारे 171 रुपयाने स्वस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.