मुंबई - व्यावसायिक स्वयंपाकाचा गॅस (19 किलो) एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 250 रुपयांनी वाढ झाली आहे. आता त्याची किंमत आजपासून 2253 रुपये होणार आहे. (LPG Cylinder price hiked) दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही नाही.
-
19 kg commercial cooking gas LPG price hiked by Rs 250 per cylinder. It will now cost Rs 2253 effective from today. No increase in the prices of domestic gas cylinders. pic.twitter.com/h8acfRh6mn
— ANI (@ANI) April 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">19 kg commercial cooking gas LPG price hiked by Rs 250 per cylinder. It will now cost Rs 2253 effective from today. No increase in the prices of domestic gas cylinders. pic.twitter.com/h8acfRh6mn
— ANI (@ANI) April 1, 202219 kg commercial cooking gas LPG price hiked by Rs 250 per cylinder. It will now cost Rs 2253 effective from today. No increase in the prices of domestic gas cylinders. pic.twitter.com/h8acfRh6mn
— ANI (@ANI) April 1, 2022
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ - यामध्ये घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दर आज स्थिर असले तरीही मागील १० दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे.
प्रतिलिटर सुमारे १२ ते २५ रुपयांपर्यंत वाढ - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०१.८१ रुपये झाला असून, डिझेलचा दर ९३.०७ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ११६.७२ रुपये आणि डिझेलचा दर १००.९४ रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १२ ते २५ रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.
प्रतिबॅरल ११० डॉलरवर - रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल ११० डॉलरवर गेला आहे.
निवडणुकांच्या निकालानंतर वाढ - यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे.
घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ९४९.५० - २२ मार्चपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. तर, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ९४९.५० इतकी आहे. तर, दिल्लीत ९४९.५० रुपये आहे.
हेही वाचा - Price Cheap of CNG and PNG : आजपासून सीएनजी ६ तर पीएनजी ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त!