ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू, 4 जखमी - तामिळनाडू लेटेस्ट न्यूज

रविवारी येथे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे भिंत कोसळून एक आठ वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईसह तिघे ठार झाले. सिलिंडरचा स्फोट झाला तेव्हा घराच्या मालकाच्या आणि भाडेकरूच्या शेजारी असलेल्या घराच्या काही भागाची भिंत पडली. भिंत कोसळल्याने भाडेकरू जे. कामठी आणि त्यांचा मुलगा जे. हेमनाथ आणि शेजारी एस. चंद्रा यांचा मृत्यू झाला. कामठी यांचे पती एम. जानकीरामन आणि दुसरा मुलगा जे. सुरेश (वय 15) आणि आणखी दोन शेजारी महिला जखमी झाल्या.

तामिळनाडूमध्ये गॅस सिलिंडर स्फोट
तामिळनाडूमध्ये गॅस सिलिंडर स्फोट
author img

By

Published : Nov 15, 2020, 7:58 PM IST

तिरुवन्नमलाई (तामिळनाडू) - रविवारी येथे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे भिंत कोसळून एक आठ वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईसह तिघे ठार झाले. या दुर्घटनेत आणखी चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची नोंद करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. जवळच्या अरणी येथे एका घरात गॅस गळतीमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सिलिंडरचा स्फोट झाला तेव्हा घराच्या मालक आणि भाडेकरूंच्या दरम्यान असलेल्या घराच्या काही भागाची भिंत पडली. भिंत कोसळल्याने भाडेकरू जे. कामठी आणि त्यांचा मुलगा जे. हेमनाथ आणि शेजारी एस. चंद्रा यांचा मृत्यू झाला. कामठी यांचे पती एम. जानकीरामन आणि दुसरा मुलगा जे. सुरेश (वय 15) जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

'स्फोटामुळे पुडुकामुर रोडवर घर असलेल्या 55 वर्षीय डी. मुक्ताबाई आणि त्यांची 15 वर्षांची मुलगी डी. मीना अनुक्रमे 90 टक्के आणि 50 टक्के भाजल्या,' अधिकाऱ्याने सांगितले. अरणी येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना शेजारच्या वेल्लोर येथील शासकीय सुविधा येथे दाखल करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - जादू-टोण्यातून सात वर्षीय चिमुकलीची हत्या, शरीरातील अवयव घेतले काढून

मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मृत्यूंवर शोक व्यक्त करत कामठी आणि चंद्रा यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. या अपघाताची माहिती समजल्यानंतर, पलानीस्वामी यांनी सांगितले की, त्यांनी जिल्ह्यातील रहिवासी असलेले हिंदू धार्मिक व धर्मादाय विभाग विभागाचे मंत्री सेवर रामचंद्रन आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य हाती घ्यावे आणि जखमींवर चांगल्या दर्जाचे उपचार होत असल्याची खात्री करून घ्यावी, असे सांगितले. .

पलानीस्वामी यांनी लोकांना आपल्या घरात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडर वापरताना काळजी घ्यावी असे आवाहनही केले. पीएमकेचे संस्थापक नेते एस. रामदॉस यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपयांची मदत उपलब्ध करून द्यावी आणि नुकसान झालेल्या घरांची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी केली.

एलपीजी सिलिंडर्स वापरताना होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते, असे रामाडॉस म्हणाले आणि त्यांनी जनजागृती कार्यक्रमात तेल कंपन्यांनी पुरविलेली माहिती समजून घेऊन सावधगिरीने राहण्याची विनंती केली.

हेही वाचा - तेलंगणात दिवाळीदरम्यान घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 तरुण बुडाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.