झाशी (उत्तरप्रदेश) : जिल्ह्यात एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे. येथे दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या. प्रेमात एका मुलीने तिचे लिंग बदलले. प्रेयसीने मुलगा होताच दुसऱ्या मुलीने लग्नाकडे पाठ फिरवली. आता ती प्रेयसी त्या मुलाला जाऊन पुन्हा मुलगी होण्यास सांगत असल्याचा आरोप आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.
प्रेमात पडली अन् झाला दुरावा: सना (आता सुहेल खान) चे वकील भागवत शरण तिवारी यांच्या मते, झाशी येथे राहणारी सना खान सोनल श्रीवास्तव या मुलीच्या प्रेमात पडली. मुलीने सांगितले की, एकत्र राहण्यासाठी दोघांपैकी एक पुरुष असणे आवश्यक आहे. तुला माझ्यासोबत आयुष्य घालवायचं असेल तर तुला पुरुष व्हावं लागेल. दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये सना खानचे ऑपरेशन झाले आणि ती पुरूष झाली. त्याने आपले नाव बदलून सुहेल खान ठेवले. त्याने सोनल श्रीवास्तवला दिल्लीतच एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून दिली. तिथे ती कोणाच्या तरी प्रेमात पडली. यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
सोहेलने घेतली न्यायालयात धाव: भागवत शरण तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांनंतर सना खान (सोहेल खान) त्याच्या मैत्रिणीला भेटली आणि तिला आयुष्यभर तिच्यासोबत राहण्याच्या वचनाची आठवण करून दिली. सना खान म्हणाली की, तुझ्या प्रेमात मी मुलीपासून मुलगा झाली आहे. पण याचाही सोनलवर काहीही परिणाम झाला नाही. सनाने अनेक वेळा विनवणी केली, पण दुसऱ्या मुलीचे मन डगमगले नाही. ती म्हणाली की, 'मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तुला वाईट वाटत असेल तर जा आणि पुन्हा मुलगी हो. हे ऐकून ती खूप अस्वस्थ झाली आणि शेवटी तिने न्यायालयाचा आसरा घेतला.
२०१७मध्ये झाला होता विवाह: वकिलाने असेही सांगितले की, याआधीही ही मुलगी तिच्या मैत्रिणीचा सर्व खर्च उचलत असे आणि दोघेही पती-पत्नीसारखे राहत होते. दोघांमध्ये खूप प्रेम होते. दोघेही सोशल मीडियावर प्रेमाने भरलेल्या रील पोस्ट करत असत, पण आता दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. 18 सप्टेंबर 2017 रोजी दोन्ही मुलींचा विवाह झाला होता. दोघांमधील वादानंतर सना खान उर्फ सोहेल खानने 30 मे 2022 रोजी पहिली ऑनलाइन तक्रार दाखल केली. हा दावा ३ जून रोजी न्यायालयात सादर करण्यात आला. यानंतर सोहेल खानचा जबाब नोंदवण्यात आला. राजू अहिरवार आणि अजय कुमार या दोन साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले.
अटक करून आणले न्यायालयात: राजू अहिरवार हा सोहेल खानचा ड्रायव्हर होता आणि त्यावेळी तो त्याच्यासोबत दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये लिंग बदलासाठी गेला होता. कोर्टाकडून सोनल श्रीवास्तव यांना समन्स पाठवण्यात आले होते मात्र सोनल श्रीवास्तव यांनी समन्स स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर वॉरंटही पाठवण्यात आले मात्र सोनल श्रीवास्तव कोर्टात हजर राहिली नाही. यानंतर सोनल श्रीवास्तव यांच्या नावावर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. यावरून पोलिसांनी 18 जानेवारी रोजी सोनल श्रीवास्तवला तिचा मेहुणा मनीष गर्गच्या घरातून अटक करून न्यायालयात हजर केले.
शस्त्रक्रियेसाठी सहा लाखांचा खर्च: वैद्यकीय तपासणीनंतर तिची कोठडीत रवानगी करण्यात आली. तिला १९ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. सोनलच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे. १९ जानेवारीला सायंकाळी सोनलला जामीन मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी सहा लाख रुपये खर्च झाल्याचे सोहल खान सांगतात. सुहेल खानने सांगितले की, सोनल श्रीवास्तव त्याच्यासोबत राहायची पण ती रात्री उशिरा मोबाइलवर कोणाशी तरी गुप्तपणे बोलायची. याला त्यांनी विरोध केला आणि येथून हा वाद सुरू झाला.