पाटणा- बिहारमध्ये दारू बंदी केवळ कागदोपत्री ( liquor ban in bihar ) दिसत आहे. काही दारुडे इतके बेफाम आहेत की त्यांनी पोलिसांना उघड आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे असे ताजे प्रकरण समोर आले आहे. बिहारमध्ये मद्य प्राशन करण्यासाठी लोको पायलटने चक्क रेल्वे थांबविली. जिल्ह्यातील हसनपूर रेल्वे स्थानकावर ही विचित्र घटना घडली आहे. यादरम्यान स्टेशनवर तासभर गोंधळ झाला. अखेर दुसऱ्या चालकासह रवाना रवाना करण्यात ( (Driver stopped train in bihar to consume liquor) आली.
लोको पायलट रेल्वे उभी करून दारू पिण्यासाठी गेला- मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील समस्तीपूरहून सहरसाकडे जाणारी 05278 पॅसेंजर ट्रेन जिल्ह्यातील हसनपूर रेल्वे स्थानकावर बराच वेळ उभी होती. यादरम्यान प्रवाशांकडून रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु सहायक लोको पायलट नसल्याची माहिती मुख्य चालकाने स्थानक व अधिकाऱ्यांना ( Train driver drunk alcohol on duty ) दिली. हसनपूर रेल्वे स्थानकावर ( Uproar at Hasanpur station ) गोंधळ उडाला. खूप प्रयत्नानंतर स्टेशन मास्तरांनी पर्यायी व्यवस्था केली. त्यानंतर रेल्वे पुढच्या स्टेशनला रवाना झाली. हसनपूर स्टेशन मास्टरने रेल्वेध्ये धावणाऱ्या दुसऱ्या असिस्टंट लोको पायलटला मेमो ( Driver stopped train in bihar to consume liquor ) पाठवला. त्याचवेळी या घटनेमुळे हसनपूर स्थानकावर घबराटीचे वातावरण होते.
तासभर थांबली ट्रेन : दरम्यान, सहाय्यक लोको पायलट कर्मवीर प्रसाद यादव उर्फ मुन्ना हा दारू पिऊन रेल्वेमधून निघून हसनपूर मार्केटमध्ये गोंधळ घालत असल्याची बातमी आली. जीआरपी घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमानंतर त्याला जीआरपी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी हसनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. कर्मवीर प्रसाद यादव असे मद्यधुंद रेल्वे चालकाचे नाव आहे. तो जितवारपूर येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून दारूची बाटलीही जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या बाटलीत काही दारू शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. हसनपूर रोड स्थानकावरून पॅसेंजर रेल्वे सुमारे एक तास उशिराने संध्याकाळी 6.47 वाजता सुरू झाली.
हेही वाचा-Rahul Gandhi Viral Video : नाईट क्लबमध्ये राहुल गांधी; भाजपने निशाणा साधत केला व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा-PM Visit To Berlin : पंतप्रधानांच्या बर्लिन दौऱ्यात महाराष्ट्राचा झेंडा! पहा मोदींचे कसे केले स्वागत
हेही वाचा-Chardham Yatra 2022 : दोन वर्षानंतर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ; यमुनोत्रीचे उघडले दरवाजे