नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाउन व कर्फ्यू संदर्भात पत्र लिहिले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांचा लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे. लॉकडाउन-कर्फ्यूचा कोरोना लसीकरणावर कोणताही परिणाम नाही, हे सुनिश्चित करावे, असे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
लॉकडाउन, कर्फ्यू किंवा इतर कोणत्याही निर्बंधांमुळे लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यास काही अडचण येऊ नये, असे पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व सरकारी मंत्रालयांनाही पत्र लिहिले आहे. कोरोना रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळायला हव्यात. यासाठी रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासास वेग देण्याची गरज असल्याचे म्हटलं.
कोरोना रुग्णांची आकेडवारी -
गेल्या 24 तासांत भारतात 2,61,500 ताज्या रूग्णांची नोंद झाली. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,47,88,109 वर पोहचली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी एकदिवसीय वाढ आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1501 जण मरण पावले आणि आतापर्यंत देशातील मृत्यूची संख्या 1,77,150 वर पोहचली आहे. तर देशात सध्या 18,01316 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - महाकुंभमधून परतलेल्यासाठीराज्यांकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी