आसाम विधानसभेसाठी तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाची एकूण आकडेवारी समोर आली आहे. राज्यात विक्रमी 82.28 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
आसाममध्ये 82.28 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये 77.68 टक्के मतदानाची नोंद
18:30 April 06
आसाममध्ये 82.28 टक्के मतदानाची नोंद
18:23 April 06
पश्चिम बंगालमध्ये 77.68 टक्के मतदानाची नोंद
बंगाल - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने ही निवडणूक अतिशय चुरशीची केली आहे. येथे 77.68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
17:22 April 06
टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदान करू दिले नसल्याचा काही महिलांचा आरोप
बंगाल - डायमंड हार्बर मतदारसंघातील मतदान केंद्रावरील बर्याच मतदारांनी टीएमसी कार्यकर्त्यांनी आम्हाला मतदान करू दिले नाही, असा आरोप केला आहे. मतदान अधिकारी येथे आले होते, पण आमच्यासाठी मतदानाची सोय केली गेली नाही, असे एका महिलेने सांगितले.
17:15 April 06
अलिकडेच एक 'ऑडियो टेप'समोर आली आहे, ज्यावरून दीदींचे 10 वर्षांचे कामकाज कसे होते हे समजते. दीदी, तुम्ही बंगालमध्ये एक नवीन कर सुरू केला आहे, तो म्हणजे 'भाईपो सेवा कर'. गोर-गरीब जनतेचा कष्टाने मिळवलेला पैसा या भाईपो करात गेल्याचे मोदी म्हणाले.
16:52 April 06
दीदींच्यामध्ये एवढा अहंकार येतोच कुठुन, बंगाली मतदारांना त्या स्वत:ची जहागिरी समजतात - मोदी
दीदी बंगालच्या लोकांनी तुमच्यावर किती विश्वास ठेवला, तुम्ही बंगालच्या लोकांचा विश्वास मोडलात. तुम्ही बंगालच्या भावनाप्रधान लोकांचे मन मोडून टाकले. तुम्हाला बंगालचे भाऊ-बहीण दिसत नाहीत, यांना फक्त मते हवी आहेत. भाजपच्या सभांना लोक पैसे घेऊन येतात असा आरोप त्या करत आहेत. बंगाली बंधू-भगिनी पैसे घेऊन मतदान करत असल्याचे त्या म्हणत आहेत. दीदींच्यामध्ये एवढा अहंकार येतोच कुठुन, बंगाली मतदारांना त्या स्वत:ची जहागिरी समजतात.
16:20 April 06
दीदी म्हणतात 'अमरा देखो नेबो', मात्र भाजप म्हणतो 'आमरा सेवा करबो' - पंतप्रधान
हावराह (बंगाल) - दीदींनी पश्चिम बंगालचे जे काही केले त्याचे आता सत्य समोर आले आहे. दीदी पश्चिम बंगालच्या लोकांना धोका देत आहेत. दीदी म्हणतात 'अमरा देखो नेबो', मात्र भाजप म्हणतो 'आमरा सेवा करबो'. निवडणुकीतून आम्ही विनम्रपणे लोकांची सेवा करण्याची संधी मागत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हावराह येथे प्रचारसभेत म्हणाले.
दीदी यांच्या पक्षाला मतदान केंद्रांवर मतदान एजंट मिळत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी दीदी निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांवर त्यांचा निवडणूक एजंट रोखत असल्याचा आरोप करीत होत्या. आता त्यांनी हे मान्य केले आहे की, त्यांचे हे एजंट त्यांच्याविरूद्धच बंड करत आहेत.
16:02 April 06
बंगाल - डीही बगनान परिसरात टीएमसी उमेदवार सुजाता मंडल यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप
बंगाल - डीही बगनान परिसरात टीएमसी उमेदवार सुजाता मंडल यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंडल यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली आहे.
अरंदी -१ बूथ क्रमांक 263 महाल्लापारा येथे टीएमसीच्या उमेदवार सुजाता मंडल यांच्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. तिच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे व त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असे टीएमसीचे डेरेक ओ-ब्रायन यांनी सांगितले.
15:37 April 06
बंगालमधील सर्व निवडणुका सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच होतात - अधीरंजन चौधरी
पश्चिम बंगालमध्ये सगळ्या निवडणुका सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच होतात. म्हणूनच मागल्या निवडणुकीवेळी सध्याच्या सत्ताधारी पक्षाचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. येथे निवडणूक म्हणजे हिंसाचार अशीच स्थिती असून कायद्याचे राज्य इथे उरलेले नाही, असे काँग्रेस नेते अधीरंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात मतदान मशीन (ईव्हीएम) सापडल्यानंतर सांगितले.
15:31 April 06
दुपारी १ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ५३.८९ टक्के मतदान

14:20 April 06
पश्चिम बंगाल : तृणमूलच्या महिला उमेदवाराला हाकलून लावले..
आरमबागमधील तृणमूलच्या उमेदवार सुजाता मोंडल यांना स्थानिकांनी हाकलून लावले. मतदान केंद्र क्रमांक २६३ आणि २६३अ हे भाजपाने ताब्यात घेतले असून, सुरक्षा दलेही भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप सुजाता यांनी यावेळी केला.
13:28 April 06
- आसाममध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ५३.२९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:10 April 06
पश्चिम बंगाल : तृणमूलच्या उमेदवारावर हल्ला; भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप
उलुबेरिया मतदारसंघातील तृणमूल उमेदवार निर्मल माझी यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये त्यांचे दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप माझी यांनी केला आहे.
12:56 April 06
पश्चिम बंगाल : रात्रीपासून बेपत्ता भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह मिळाला
पश्चिम बंगालच्या दुब्रजपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आला आहे. पतिहार डोम असे नाव असलेला हा कार्यकर्ता सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होता. त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
11:34 April 06
पश्चिम बंगाल : ३४.७१ टक्के मतदानाची नोंद..
पश्चिम बंगालमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ३४.७१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:32 April 06
पश्चिम बंगाल : ४० पैकी २२ जागा भाजपा जिंकेल; उमेदवाराचा दावा
आसाममधील भाजपा उमेदवार हिमांता बिसवा सर्मा यांनी मतदान केले. या टप्प्यातील ४० पैकी २२ जागा भाजपा जिंकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
11:31 April 06
आसाममध्ये ३३.१५ टक्के मतदान..
आसाममध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ३३.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:14 April 06
पश्चिम बंगाल : तृणमूलने आयएसएफचे कॅम्प कार्यालय ताब्यात घेतल्याचा आरोप..
पश्चिम बंगालच्या जगतबल्लवपूरमध्ये एक आयएसएफ कॅम्प तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूलने हे आरोप फेटाळले आहेत.
10:36 April 06
पश्चिम बंगाल : ज्या ठिकाणी आम्ही मजबूत, त्याच ठिकाणी गदारोळ - तृणमूल उमेदवार
राज्यात बऱ्याच ठिकाणी शांततेत मतदान पार पडत आहे. मात्र, ज्या ठिकाणी आमची स्थिती भक्कम आहे, त्या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते गदारोळ करत आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. केंद्राने तैनात केलेल्या सुरक्षा दलातील लोकच नागरिकांना भाजपाला मतदान करण्यास सांगत आहेत असा आरोप तृणमूल उमेदवार सुजाता मोंडल यांनी केला आहे.
10:32 April 06
पश्चिम बंगाल : तृणमूल-भाजपा कार्यकर्त्यांचा एकमेकांवर आरोप..
पश्चिम बंगालच्या धानेखाली येथील मतदान केंद्र क्रमांक १३९ आणि १४०वर तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी तृणमूल आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
09:35 April 06
पश्चिम बंगाल : आयएसएफ कार्यकर्त्यांनी मतदारांवर बॉम्ब फेकल्याचा आरोप..
सत्सा येथील काही आयएसएफ कार्यकर्ते लोकांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखत आहेत. यासाठी ते बॉम्बचा वापर करत असल्याची माहिती मला समजली आहे, असे तृणमूल खासदार सौकत मोल्ला यांनी म्हटले. याप्रकरणी मी पोलीस तक्रार दिली असून, आता मी स्वतः त्या मतदान केंद्राकडे जाणार असल्याचेही ते म्हणाले.
09:27 April 06
सकाळी नऊ वाजेपर्यंतची टक्केवारी..
पश्चिम बंगालमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत १४.६२ टक्के, तर आसाममध्ये १२.८३ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे.
09:20 April 06
पश्चिम बंगाल : दक्षिण २४ परगणा मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप..
दक्षिण २४ परगणामध्ये तृणमूलचे गुंड लोकांना मतदानास जाऊ देत नसल्याचा आरोप भाजपा उमेदवार दीपक हलदार यांनी केला आहे. मात्र, असा प्रकार केवळ भाजपाच करते सध्या लोक त्यांच्या सोबत नसल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत असे मत तृणमूल आमदार सौकत मोल्ला यांनी व्यक्त केले.
09:05 April 06
पश्चिम बंगाल : कॅनिंगमध्ये मतदानापूर्वी तणाव..
- बंगालच्या कॅनिंगमध्ये तृणमूल-आयएसएफ कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर तणाव निर्माण झाला आहे. तृणमूल कार्यकर्त्ये आयएसएफ कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
- यासोबतच, हिंचेखाली गावात एका भाजपा कार्यकर्त्याला काल (सोमवार) रात्री भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळेही परिसरात तणावाचे वातावरण आहे.
09:02 April 06
पश्चिम बंगाल : तृणमूल कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा खून केल्याचा आरोप..
पश्चिम बंगालच्या गोघाटमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याच्या आईची हत्या करण्यात आली. ही हत्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली असा आरोप आता करण्यात येत आहे.
08:43 April 06
पश्चिम बंगाल : सेक्टर ऑफिसर आणि सेक्टर पोलिसाचे निलंबन
तृणमूल नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आढळल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करत, सेक्टर ऑफिसर आणि संबंधित सेक्टर पोलिसाचे निलंबन केले आहे. ही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन राखीव होती. या दोन्ही मशीन बाद ठरवण्यात आल्या असून, त्यांचा आता निवडणूक प्रक्रियेत वापर होणार नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
08:25 April 06
पश्चिम बंगाल : तृणमूल नेत्याच्या घरी आढळले ईव्हीएम मशीन..
बंगालच्या उलूबेरिया उत्तर मतदारसंघातील तृणमूल नेते गौतम घोष यांच्या घरात ईव्हीएम आणइ व्हीव्हीपॅट मशीन आढळून आले आहेत. भाजपा नेते चिरन बेरा यांनी याबाबत आरोप केल्यानंतर, घोष यांच्या घराची झडती घेण्यात आली, ज्यामध्ये हे मशीन आढळून आले.
07:29 April 06
पश्चिम बंगाल : हुगळीमध्ये मतदानास सुरुवात नाही..
हुगळीच्या अरामबागमध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावर अजूनही मतदानास सुरुवात झाली नाही. त्यामुळे मतदार केंद्राबाहेर रांगेत उभे आहेत.
07:25 April 06
मोदींनी केले मतदानाचे आवाहन..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटच्या माध्यमातून चार राज्ये आणि एका मतदारसंघातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
07:24 April 06
आसाम : वृद्ध दाम्पत्याने बजावला मतदानाचा हक्क..
आसाममध्ये एका वृद्ध दाम्पत्याने सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.
07:00 April 06
मतदानाला सुरुवात..
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे.
06:48 April 06
कोणत्या राज्यात किती जागांसाठी धुमशान?
आसाममध्ये या टप्प्यात ४० मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये या टप्प्यात ३१ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे.
06:43 April 06
तयारी पूर्ण.. थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात!
दोन्ही राज्यांमधील मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत दोन्ही टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ आणि झटापटीच्या घटना पहायला मिळाल्या. त्यामुळे इथून पुढील टप्प्यांमधील मतदान शांततेत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनावर असणार आहे.
06:34 April 06

आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा आज पार पडेल. बंगालच्या निवडणुकीसाठी एकूण आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर, आसामचा हा तिसरा आणि शेवटचा टप्पा असणार आहे.