आग्रा - धारिया गावात बोअरवेलमध्ये पडलेला चार वर्षांच्या मुलाला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. निबोहरा परिसरातील धारियाई गावात ही घटना घडली. खेळता-खेळता 4 वर्षीय मुलाग शिवा बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेलची खोली 135 फूट होती. अखेर 9 तासानंतर त्याला बाहेर काढण्यात आले आहे
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना झाली होती. तेव्हापासून रेक्स्यू ऑपरेशन सुरू होते. लष्कराच्या पथकाने दोरीच्या मदतीने बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडला आणि मुलाची स्थिती जाणून घेतली. सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. त्यानंतर सैन्यदलाने शिवाच्या कुटुंबाला त्याच्याशी बोलण्यास सांगितले आणि त्याला धीर दिला. तसेच दोरीच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये बिस्किट आणि पाणी पाठविण्यात आले होते. तसेच बोअरवेलमध्ये ऑक्सिजनही सोडण्यात आले होते.
लष्कर व एनडीआरएफचे पथख शिवाला बाहेर काढण्यात यशस्वी झाले. शिव बाहेर येताच कुटुंबीय व तेथील जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. शिवाला आरोग्य विभागाच्या पथकाकडे सोपविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या एक पथकाकडून शिवाच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वीही बोअरवेलमध्ये लहान मुले पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.