CUET UG निकाल 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी/NTA ने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG 2022 चा निकाल जाहीर केला आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी निकाल जाहीर झाला आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनीही 15 सप्टेंबर 2022 पर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती दिली होती. या वर्षी CUET UG परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात.
पालघरमधील साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2020 मध्ये झालेल्या या घटनेच्या तपासाला तत्कालीन महाराष्ट्र सरकारने सीबीआय तपासाला विरोध केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघायमध्ये एक बैठकीला उपस्थित राहणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीला उपस्थित .
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी
युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. या प्रकरणावर केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देणे कायद्याने शक्य नसल्याचे म्हटले आहे.
काष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते मल्टिस्टेट पतसंस्थेचे उद्घाटन -
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते मल्टिस्टेट पतसंस्थेचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता होणार आहे. दुपारी 1 वाजता काष्टी येथील कोलाई देवी माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारत शुभारंभ कार्यक्रमाला देखील पवार उपस्थित.
पीएच.डी.मध्ये थेट प्रवेश - पीएचडी उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता डिझाइन (CEED) साठी सामायिक प्रवेश परीक्षा पात्र उमेदवारांना पीएच.डी.मध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश मिळत होता. मात्र केंद्र सरकार नियमात बदल करणार आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) च्या मागणीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) आपले नियम बदलण्यासाठी बैठक बोलावली आहे. नवीन नियमांनुसार, CEED पात्र उमेदवारांना देखील अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) समतुल्य मानले जाईल.
आजही अनेक रेल्वे गाड्यांची रद्द - आज अनेक रेल्वे ट्रेन करण्यात आल्या आहेत. तर काहीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तुम्ही बदल झालेल्या गाढ्याची माहिती IRCTC या संकेत स्थळावर पाहू शकता. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होतांना दिसत आहेत.
सोनाली फोगट मृत्यू: सीबीआयने केला हत्येचा गुन्हा दाखल, सीबीआय लवकरच गोव्याला
सोनालीच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी कुटुंबीय सातत्याने करत होते. गोवा पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सोनाली फोगटचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये मृत्यू झाला. आता एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयचे पथक गोव्याला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री, भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे उपस्थित रहाणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी सहा वाजता होईल.
‘जागतिक ओझोन दिना’निमित्त कार्यक्रम
‘जागतिक ओझोन दिना’निमित्त केंद्रीय मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित राहतील. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात होईल.
ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या जामीनावर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे.
आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर - युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर. सकाळी 10.30 वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होणार आहे.
शासन आपल्यादारी अभियानाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात शासन आपल्यादारी अभियानाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता होणार आहे. इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बूथ आढावा देखील त्या घेतील.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज सर्वसाधारण सभेला हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाचे नेते या सभे जिल्ह्यातील महत्वाचे नेते या सभेला उपस्थित राहतील.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची पत्रकार परिषद
धडगाव तालुक्यातील दुर्देवी तरुणीच्या गावाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे भेट देऊन पत्रकार परिषद घेणार आहेत.
पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची पत्रकार परिषद
पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे, संध्याकाळी 6.30 वाजता.
बाबा रामदेव यांची पत्रकार
योगगुरू बाबा रामदेव आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते पतंजली समूहाच्या 5 कंपन्यांच्या आयपीओबाबत (IPO) तपशीलवार माहिती देतील. योगगुरू रामदेव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा आयपीओ लाँच करण्याची योजना आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पिक विम्याचे प्रलंबित प्रश्न आणि जिल्ह्यातील पीक नुकसानी मध्ये जिल्ह्याला डावलले गेलय असं म्हणत आज राष्ट्रवादी, शिवसेना इतर राजकीय पक्ष एकत्रित येऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. यामध्ये धनंजय मुंडे आणि प्रकाश साळुंके सामील होणार आहेत, दुपारी 2 वाजता.
शिवसैनिकांचा मेळावा बुलढाणा येथे आज निष्ठावांत शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे उपस्थित रहाणार आहेत, दुपारी 2 वाजता.
उसाच्या गळीत हंगामाबाबत बैठक राज्यातील उसाचा गळीत हंगामाबाबत आज सह्याद्री अतिथीगृहावर, दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. the important events of the country in one click