भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात, पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते. मात्र, लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस मजेसाठी तान्हा पोळा Tanha Pola 2022 साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा Tanha Pola celebrated करतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला. विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण reason behind it Tanha Pola साजरा होतो.
कसा साजरा होतो तान्हा पोळा मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा हा सण येतो. या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्याकारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते. आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते. गेल्या काही वर्षांपासुन या पोळ्याला संस्कृती व स्पर्धा याची झालर लागली आहे. अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणतात. पोळा फुटायच्या आधी या सगळ्या छोट्या मुलांचे वेशभुषा निरीक्षण केले जाते. तसेच त्यांनी सजावुन आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते. पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभुषा व बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांका प्रमाणे नंबर देऊन, त्यांना योग्य ते पारितोषिक दिल्या जाते. त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांना काहीनाकाही छोटी भेटवस्तु दिली जाते.
त्यानंतर ही मुले घरी येतात. ज्याप्रमाणे मोठ्या बैलांची सर्व प्रथम घरी पुजा केल्या जाते. त्याचप्रमाणे या लाकडी बैलांच्या पूजेला देखील घरुन सुरुवात होते. त्यानंतर ही मुले आपल्या शेजारी व नातेवाईकांकडे जाऊन बोजारा जमा करतात, म्हणजे त्यांना पैसे किंवा भेटवस्तु दिल्या जाते.
लहान मुलांना देखील शेतीचे व त्यात राबराब राबणाऱ्या बैलांचे महत्व कळावे. आपल्या कृषीप्रधान संस्कृती विषयी ते कृतज्ञ राहावे, यासाठी कदाचित तान्हा पोळा हा सण साजरा करण्याची प्रथा विदर्भात रुजली असावी.
हेही वाचा Bail Pola 2022 यंदा शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी पोळा, कसा साजरा केला जातो पोळा घ्या जाणून