PM Modi Mann Ki Baat : महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करणार आहेत. PM मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी, दूरदर्शन वाहिन्यांवर प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रमाचा हा 92 वा भाग असेल.
Nitin Gadkari on Jaipur Visit : केंद्रीय मंत्री नितीन आज जयपूर दौऱ्यावर आहेत. रविवारी दुपारी 4 वाजता धानक्या येथे 106 व्या जयंती कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
Devendra Fadnavis on Pune Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या युवा उद्योजकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
Arvind Kejriwal on Guhjrat Visit Today: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रविवारी अहमदाबादला भेट देतील आणि स्वच्छता कर्मचारी, अस्थायी कर्मचारी आणि गुजरात सरकारच्या तरुणांशी संवाद साधतील. भाजपशासित गुजरातच्या भेटीपूर्वी केजरीवाल म्हणाले की गुजरातमधील समाजातील प्रत्येक घटक आम आदमी पक्षाकडे (आप) आशेने पाहत आहे.
New Chief Minister of Rajasthan : राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची आज घोषणा?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत सामील झाले आहेत. गेहलोत यांच्या उमेदवारीपूर्वी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत कसरत सुरू झाली आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजता जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.
Ankita Murder Case : अंकिताचा मृतदेह श्रीनगरला पोहोचला, आज होणार अंत्यसंस्कार
अंकिता भंडारीचे पार्थिव उत्तराखंडमधील श्रीनगर गढवालमध्ये पोहोचले आहे. आज, रविवारी अंकिता भंडारी यांच्या पार्थिवावर एनआयटी घाट श्रीनगर येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाची पथके घाटावर आणि शवागारावर हजर आहेत.
Nitish Kumar meet Sonia Gandhi : लालूप्रसाद यादव, नितीशकुमार सोनिया गांधींना भेटणार -
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी पावले उचलत आहेत. राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यासोबत ते आज संध्याकाळी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या नेत्यांमध्ये भाजपविरोधी आघाडीबाबत चर्चा होणार आहे. नितीश कुमार रविवारी हरियाणातील फतेहाबाद येथे दिवंगत चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त इंडियन नॅशनल लोक दल (INLD) च्या रॅलीलाही उपस्थित राहणार आहेत.