ETV Bharat / bharat

भारतीय नौदल दिवस : राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा.. - भारतीय नौदल दिवस

भारतीय नौदल हे निर्भिडपणे देशाच्या सागरी तटांची रक्षा करते, तसेच संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठीही धावून जाते. आपल्या देशाला कित्येक वर्षांचा आरमार दलाचा इतिहास आहे. नौदल दिनाच्या सर्व नौदल जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. तर, नौदलातील जवानांच्या धाडसाला आणि देशभक्तीला माझा सलाम, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले..

Leaders extend greetings on Navy Day
भारतीय नौदल दिवस : राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा..
author img

By

Published : Dec 4, 2020, 11:16 AM IST

नवी दिल्ली : चार डिसेंबर हा दिवस आपण 'भारतीय नौदल दिन' म्हणून साजरा करतो. यावर्षी नौदल दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नौदलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय नौदल हे निर्भिडपणे देशाच्या सागरी तटांची रक्षा करते, तसेच संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठीही धावून जाते. आपल्या देशाला कित्येक वर्षांचा आरमार दलाचा इतिहास आहे. नौदल दिनाच्या सर्व नौदल जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. तर, नौदलातील जवानांच्या धाडसाला आणि देशभक्तीला माझा सलाम, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

  • Navy Day greetings to all our valorous navy personnel and their families. The Indian navy fearlessly protects our coasts and also renders humanitarian assistance in times of need. We also remember India’s rich maritime tradition over centuries. pic.twitter.com/k2PMgvc0F3

    — Narendra Modi (@narendramodi) December 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • "On the occasion of #NavyDay2020 we reaffirm #IndianNavy's steadfast commitment to the service of the Nation and towards ensuring our Maritime Security & Territorial Integrity"
    Admiral Karambir Singh, Chief of the Naval Staff & all personnel of Indian Navy pic.twitter.com/t6LWHUyvjm

    — SpokespersonNavy (@indiannavy) December 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • शं नो वरुण:

    "जल के देवता हमारे लिए शुभ हों"#नौसेना_दिवस के अवसर पर भारत की समुद्री सीमाओं के सजग प्रहरियों के शौर्य को नमन, उनके परिजनों के धैर्य को नमन!

    कृतज्ञ देश, राष्ट्र की सुरक्षा और सेवा में आपके अदम्य साहस और समर्पण पर सदैव विश्वास करता है, आप पर गर्व करता है।जय हिन्द! pic.twitter.com/mHIYFeYmkr

    — Vice President of India (@VPSecretariat) December 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑपरेशन ट्रायडंट..

1971 साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडंट. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून आजच्या दिवशी भारतीय नौसेना 'नेव्ही डे' साजरा करते.

इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून भारतीय नौदलाची सुरूवात झाली. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

हेही वाचा : 'शेतकरी आंदोलनाचा सरकारवर दबाव, किमान आधारभूत किमतीवर सकारात्मक चर्चा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.