चेन्नई (तामिळनाडू) - न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीवेळी असभ्य वर्तन करणे एका वकीलाला चांगलेच महागात पडले आहे. ज्या महिलेसोबत असभ्य वर्तन केले त्या महिलेला चार लाख रुपयांची भरपाई वकीलाने द्यावी, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने ( Madras High Court ) दिला आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीच्यावेळी चेन्नई उच्च न्यायालयाची ऑनलाइन सुनावणी सुरू होती. त्यावेळी वकील अॅड. संथानाकृष्णन हजर होते. पण, कॅमेरा सुरू असल्याचे त्यांच्या लक्षान नसल्याने त्यांनी सोबत असलेल्या एका महिलेशी असभ्य वर्तन केले होते. ही घटना एका व्यक्तीने मोबाइलमध्ये चित्रीत केली. तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केले. हा व्हायरल व्हिडिओ एका न्यायाधीशाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याबाबत स्यू मोटो खटला दाखल करून घेतला. या प्रकरणाचा तपास सीबीसीआयडीला करण्याचे दिले.
त्यानंतर सीबीसीआयडीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करत अॅड. संथानाकृष्णन यांना अटक केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती पीएन प्रकाश यांनी त्या व्हिडिओत असलेल्या महिलेला चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश अॅड. संथानाकृष्णन यांना दिले आहेत. बुधवारी (दि. 6 एप्रिल) वकील संथानाकृष्णन यांनी पीडित महिलेस चार लाख रुपयांची भरपाई दिली. त्यानंतर न्यानालयाने पुढची तारीख न सांगता खटला पुढे ढकलला आहे.
हेही वाची - After honeymoon Marriage broken : मधुचंद्राच्या रात्री नववधूने सांगितले रहस्य; पतीने घेतला काडीमोड