नवी दिल्ली : NIA Nationwide Anti Terror Ops : आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये, एनआयएने दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सामील people involved in terror related activities असलेल्या लोकांच्या परिसराची देशभरात झडती NIA conducting searches nationwide घेतली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला ही माहिती दिली. तसेच १०० हुन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील पीएफआय अध्यक्षांच्या घरावर ओएमए सलाम यांनी छापा टाकला. यावेळी पीएफआय कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
-
Tamil Nadu | NIA is conducting searches at 8 places in the Madurai city area including Villapuram, Gomatipuram, and Kulamangalam. pic.twitter.com/WxKihAMayW
— ANI (@ANI) September 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tamil Nadu | NIA is conducting searches at 8 places in the Madurai city area including Villapuram, Gomatipuram, and Kulamangalam. pic.twitter.com/WxKihAMayW
— ANI (@ANI) September 22, 2022Tamil Nadu | NIA is conducting searches at 8 places in the Madurai city area including Villapuram, Gomatipuram, and Kulamangalam. pic.twitter.com/WxKihAMayW
— ANI (@ANI) September 22, 2022
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनआयए आणि ईडी जवळपास दहा राज्यांमध्ये छापे टाकत आहेत. यादरम्यान पीएफआयच्या 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) कर्नाटकातल्या मंगळुरु शहरातील PFI आणि SDPI च्या जिल्हा कार्यालयांवर छापे टाकले. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या संघटनांच्या नेत्यांच्या घरांची शहरातील 8 भागात झडती घेण्यात येत असून, त्यात मंगळुरूमधील नेलिकाई रोडवरील कार्यालयांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. PFI आणि SDPI कार्यालये असलेल्या नेलिकाई रोडच्या दोन्ही बाजूला CRPF अधिकारी तैनात आहेत. एनआयएचे अधिकारी कार्यालयात सतत तपासणी करत आहेत.
गो बॅकचा नारा: पीएफआय कार्यकर्ते तपासणी करत असताना एनआयए अधिकार्यांच्या विरोधात गो बॅकचा नारा देत आहेत. आंदोलकांना मंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले. एनआयए आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या तपास प्रक्रियेत अनेक ठिकाणी शोध घेत आहे. दहशतवादाला निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणे यात गुंतलेल्या व्यक्तींच्या निवासी आणि अधिकृत परिसरात हे शोध घेण्यात येत आहेत. 10 राज्यांमध्ये मोठ्या कारवाईत, एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांनी पीएफआयच्या 100 हून अधिक कॅडरला अटक केली आहे, सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मध्यंतरी तेलंगणातील निजामाबादसह निर्मल जिल्ह्यातील भैंसा शहर आणि जगत्याला शहरामध्ये सुमारे 20 ठिकाणी छापे टाकले होते. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अटक केलेल्यांसह अनेक संशयितांच्या घरांचीही तपासणी केली. छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. निर्मल जिल्ह्यातील भैंसामध्ये तपास अधिकाऱ्यांनी मदिना कॉलनीतील अनेक घरांची तपासणी केली. निजामाबादमध्ये झडती घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून ते तेथे पोहोचल्याचे समजते. अधिकारी भैंसामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची चौकशी करत आहेत.
मध्यंतरी एनआयएच्या पथकाने तेलंगणातील जगत्याला शहरातही छापा टाकला. काही घरांची झडती घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी संशयितांच्या घरातून अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बुचिरेड्डीपलेम खाजा नगर येथे शोध घेण्यात आला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुचिरेड्डीपालम येथील इलियास आणि त्याच्या मित्रांच्या घरांवर छापे टाकण्यात येत आहेत.