ETV Bharat / bharat

Gadarpur Rape Attempt : घरमालाकाचा जवानाच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न, पीडितेने तोडले नराधमाचे नाक - नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला

आपल्या नातेवाईकांना फोनवर बोलणाऱ्या जवानाच्या पत्नीवर घरमालकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ही घटना गदरपूर येथे 15 जानेवारीला घडली. नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर पीडितेने त्याचे नाक तोडले आहे. दरम्यान पीडितेचा पती घरी आल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपी घरमालकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Gadarpur Rape Attempt
संग्हित छायाचित्र
author img

By

Published : Jan 17, 2023, 7:32 PM IST

रुद्रपूर - कर्तव्य बजावण्यास गेलेल्या जवानाच्या पत्नीवर घरमालाकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ही घटना रुद्रपूर परिसरातील एका गावात 15 जानेवारीला घडली आहे. नराधमाच्या घरी जवान आपल्या पत्नीसह भाड्याने राहण्यास आला होता. घरी कोणी नसल्याची संधी साधत नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र पीडितेने नराधमाचे नाक तोडले आहे. घटनास्थळावर दाखल झालेल्या जवानाने नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

व्हिडिओ कॉलवर बोलताना : जवानाची पत्नी तिच्या नातेवाईकांना फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तर तिचा पती आपल्या कर्तव्यावर गेला होता. ही संधी साधून नराधमाने जवानाच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न केला. ही बाब पीडितेच्या नातेवाईकांनी तात्काळ जवानाला दिली. त्यामुळे घरी परत येईपर्यंत नराधमाने पीडितेला खोलीत नेले होते. मात्र जवानाने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन महिन्यापासून आले होते: रुद्रपूर परिसरात सेनेत कर्तव्य बजावणारा जवान दोन महिन्यापूर्वी या शिक्षक असलेल्या घरमालकाच्या खोलीत भाड्याने राहण्यासाठी आला होता. 15 जानेवारीला त्याचा परिवार नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेला होता. त्यामुळे नराधम घरमालक घरी एकटाच होता. तर जवान आपल्या कर्तव्यावर गेल्यानंतर पीडिता नातेवाईकांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. यावेळी नराधमाने पीडितेला ओढून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने तोडले नाक : व्हिडिओ कॉलवर बोलणाऱ्या पीडितेला नराधमाने ओढून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने जोरात आरडाओरडा केला. त्यावेळी व्हिडिओ कॉलवर बोलणाऱ्या नातेवाईकांनी याबाबत जवानाला माहिती दिली. तरीही घरमालकाने पीडितेला खोलीत नेले. यावेळी पीडितेने आपली सुटका करण्यासाठी नराधमाच्या नाकाचा चावा घेतला. त्यामुळे त्याचे नाक तोडल्या गेले. पीडितेच्या पतीने घरी धाव घेत आरोपीला पडकून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Buldana Crime : शेगावात धाडसी घरफोडीत कोट्यवधीचे दागिने, रोख रक्कम लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.