हैदराबाद - माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. 2 ऑक्टोबर रोजी भारतातील दोन महान नेत्यांचा जन्मदिवस असतो. याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही जयंती असते तर देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा जन्मदिवसही याच दिवशी असतो.
लालबहादुर शास्त्री यांच्याबद्दलच्या खास गोष्टी -
- लालबहादुर शास्त्री काशी विद्यापीठात गेले. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव 'शास्त्री' असे होते. विशेष म्हणजे पुढे त्यांनाच शास्त्री या नावाने म्हणजे पदीवीनेच ओळखले जाऊ लागले.
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक विभागांचा पदभार सांभाळला. रेल्वे, परिवहन, उड्डाण, आर्थ, उद्योग, गृह यासारखी अनेक खाती त्यांनी सांभाळली. पंडित नेहरु आजारी असताना ते बिनखात्याचे मंत्री राहिले.
- लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधी यांना गुरु मानत. योगायोग असा की लालबहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म एकाच दिवशी झाला. त्यामुळे दोघांचीही जयंती एकाच दिवशी साजरी केली जाते. दोघांनीही आपले संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले.
लाल बहादुर शास्त्रींच्या जयंतीदिवशी त्यांचे 10 विचार ( Lal Bahadur Shastri Slogans ) -
- 'आपण राहू किंवा न राहू देश मजबूत राहिला पाहिजे व झेंडा डौलाने फडकला पाहिजे
- देशाविषयीची निष्ठा सर्व प्रकारच्या निष्ठांच्या आधी येते. कारण हीच खरी निष्ठा असते कारण कोणी असा विचार करत नाही की, त्या बदल्यात आपल्याला काय मिळते.
- ''आम्ही केवळ स्वत:चा नाही तर संपूर्ण जगाची शांती, विकास आणि कल्याणमध्ये विश्वास ठेवतो'
- 'जर एखादा व्यक्ती आपल्या देशात अस्पृश्य म्हटला जात असेत तर भारताला आपली मान शरमेने खाली घालावी लागेल.'
- ' जर मी एक हुमूकशाह असतो तर धर्म व राष्ट्र वेग-वेगळे असते. मी धर्मासाठी आपला जीवही देईन मात्र हे माझे खासगी जीवन आहे. राष्ट्राशी याचा संबंध नाही'
- ''लोकांना खरी लोकशाही व स्वराज्य कधीही हिंसेने व असत्याने प्राप्त होणार नाही''
- ''देशाच्या विकासासाठी आपल्याला आपापसात लढण्यापेक्षा गरिबी, रोगराई व अज्ञानाशी लढावे लागेल'
- -'स्वातंत्र्याचे रक्षण केवळ सैनिकांचे काम नाही, संपूर्ण देशाला मजबूत व्हावे लागेल'
- ''जे सत्तेत आहेत, त्यांनी पाहिले पाहिजे की, लोक प्रशासनाबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतात. शेवटी जनताच प्रमुख आहे '
- 'भलेही आपल्याला देशाचे स्वातंत्र्य पाहिजे, मात्र त्यासाठी आपण कोणाचा शोषण केले पाहिजे व न ही दुसऱ्या देशाला कमी लेखले पाहिजे.'