ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमा वाद : भारत-चीन लष्करात 9 तास म‌ॅरेथॉन चर्चा

भारत-चीन दरम्यान शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पुर्व लढाखमधील सीमावाद मिटवण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. ही बैठक सकाळी 10: 30 वाजता सुरू झाली आणि 7: 30 वाजता संपली. एकूण 9 तास ही बैठक चालली.

author img

By

Published : Aug 1, 2021, 10:03 AM IST

भारत-चीन सीमा वाद
INDIA CHINA MILITARY TALK

नवी दिल्ली - भारत चीनमध्ये सीमावादावर काल (शनिवार) चर्चेची बारावी फेरी पार पडली. चिनी बाजूने असणाऱ्या सीमेवरील माल्डो या ठिकाणी कॉर्प्स कमांडर स्तरावर सुमारे 9 तास ही बैठक चालली. गलवान खोऱ्यातील सीमावाद मिटला असला तरी भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत. गोग्रा हाईट्स, हॉट स्प्रिंग, हे भूभाग महत्त्वाचे असून पुर्व लढाखमधील सीमावाद मिटवण्यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. ही बैठक सकाळी 10: 30 वाजता सुरू झाली आणि 7: 30 वाजता संपली.

भारत-चीन सीमेवरील तणावर कमी करण्यावर नऊ तासांच्या मॅरेथॉन बैठकीत चर्चा झाली. अलीकडेच, चीनने LAC विवाद संपवण्यासाठी 26 जुलै रोजी चर्चा करण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, 26 जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' असल्याने बैठकीची तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली. भारत चीनमध्ये सीमावाद सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर अनेक चर्चा झाली आहे. भारताची एक इंचही जमीन कोणालाही बळकाऊ दिली जाणार नाही, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले असून त्यानुसारच चीनसोबत सीमावादावर चर्चा सुरू आहे.

गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून LAC वर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. अनेक चर्चेनंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. परंतु तरीही गोग्रा हाईट्स, हॉट स्प्रिंग असे अनेक मुद्दे आहेत. जेथे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाली होती. ज्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच वेळी, अनेक चिनी सैनिकही ठार झाले. याच वेळी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 23 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या निंगची या तिबेटी शहराला भेट दिली होती. एका दशकात तिबेटच्या राजधानीला दिलेली ही त्यांची पहिलीच भेट होती.

मागील एक वर्षापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू होता. गलवान खोरे, पँगाँग सरोवर भागात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे होते. मात्र, आता सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेवर एप्रिल 2020 नंतर जे काही बांधकाम दोन्ही देशांनी केले असेल ते सर्व काढून टाकण्यात येईल आणि जैसे थे स्थिती आणली जाणार असल्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे. पूर्वीप्रमाणे चीन आपले सैन्य फिंगर 8 (गस्त पाँईन्ट) पर्यंत मागे घेईल. तर भारतीय सैन्य फिंगर ३ जवळ थांबेल, असेही बैठकीत ठरवण्यात आले होते. तर जे काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावरही तोडगा काढला जाणार आहे. या दृष्टिकोनातून शनिवारी बैठक घेण्यात आली.

हेही वाचा - #CPC100Years : चिनी कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्षं पूर्ण, शताब्दी सोहळ्याचे पाहा फोटो

हेही वाचा - ड्रॅगनची राक्षसी महत्त्वाकांक्षा जगाला कुठे नेतेय... एक नजर!

हेही वाचा - चीनच्या हालचालींवर भारतीय सैन्यांची बारीक नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.