ETV Bharat / bharat

Ladakh Avalanche : सैन्यदलाचं प्रशिक्षण सुरू असतानाच लडाखमध्ये हिमस्खलन, एका जवानाला वीरमरण, 3 जवान बेपत्ता - हिमस्खलन

Ladakh Avalanche : लडाखमधील माउंट कुन परिसरातील भारतीय सैन्य दलातील हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) आणि आर्मी अ‍ॅडव्हेंचर विंगमधील जवानांचं प्रशिक्षण सुरू होतं. यावेळी अचानक हिस्खलन झाल्यानं यात एका जवानाला वीरमरण आलं, तर तीन जवान बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे.

Ladakh Avalanche
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 7:07 AM IST

श्रीनगर Ladakh Avalanche : हिमस्खलन होऊन भारतीय सैन्य दलातील एका जवानाला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना लडाखमधील माउंट कुनजवळ घडली आहे. या हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील तीन जवान बेपत्ता असल्याची माहितीही सैन्य दलातील ( Indian Army ) अधिकाऱ्यानं ईटीव्ही भारतला सोमवारी दिली. या बेपत्ता तीन जवानांचा शोध सैन्य दलाकडून घेतला जात असल्याचंही या अधिकाऱ्यानं यावेळी सांगितलं.

प्रशिक्षण सुरु असताना घडली घटना : माउंट कुनजवळील परिसरात भारतीय सैन्य दलातील हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) आणि आर्मी अ‍ॅडव्हेंचर विंगमधील 40 जवानांचं प्रशिक्षण सुरू होतं. सैन्य दलातील या जवानांना पर्वतारोहण प्रशिक्षण देण्यात येत असताना अचानक हिमस्खलन झालं. या हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील सैनिक अडकले होते. यातील एका सैनिकाला वीरमरण आलं. तर इतर तीन सैनिक अद्यापही बेपत्ता असल्याचं भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यानं यावेळी सांगितलं.

हिमस्खलनात अडकले जवान : लडाखमधील माउंट कुन परिसरात 8 ऑक्टोबरला भारतीय सैन्य दलातील तुकडीचं 'ट्रेन द ट्रेनर' या मोहिमेनुसार प्रशिक्षण सुरु होतं. या प्रशिक्षणादरम्यान अचानक हिमस्खलन झालं. या हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील चार जवान अडकले. त्यामुळे तत्काळ या जवानांना बचावासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र या बचावात एका भारतीय सैन्य दलातील जवानाचं पार्थिव घटनास्थळावर मिळून आलं. इतर तीन जवान अद्यापही बेपत्ता आहेत. अद्याप घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. बचावकार्य संपल्यानंतर वीरमरण आलेल्या जवानांची ओळख जाहीर केली जाईल, असं भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यानं यावेळी ईटीव्ही भारतला सांगितलं.

खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टी : लेह लडाख सीमा परिसरात सध्या भारतीय जवानांना खराब हवामानाचा आणि प्रचंड बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलातील जवानांना कर्तव्य निभावताना अनेक अडचणी येत आहेत. अशा स्थितीत बर्फात अडकलेल्या जवानांना शोधणं खूप अवघड काम आहे. मात्र हे कठीण काम भारतीय सैन्य दलाकडून सुरूच असल्याचं सैन्य दलातील या अधिकाऱ्यानं यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. JK Kupwara Encounter : कुपवाडामध्ये पाच विदेशी दहशतवाद्यांना धाडले यमसदनी; लष्करी जवानांकडून शोधमोहीम सुरूच
  2. Manipur Unrest : मणिपूरमध्ये सैन्यदलाला करावी लागली 12 अतिरेक्यांची मुक्तता, नेमके काय घडले?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.