ETV Bharat / bharat

Kumbh Sankranti 2023 : सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अशी साजरी करा कुंभ सक्रांती, वाचा सविस्तर - Special significance of Kumbh Sankranti

जेव्हा सूर्य देव एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात आणि ज्या राशीत सूर्य ग्रह प्रवेश करतात ती त्याच राशीची संक्रांती असते. हिंदू धर्मात कुंभ संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीप्रमाणे या दिवशीही स्नान-ध्यान आणि दान केले जाते. यंदा 13 फेब्रुवारीला कुंभसंक्रांत साजरी होणार आहे.

Kumbh Sankranti 2023
कुंभ सक्रांती
author img

By

Published : Feb 7, 2023, 4:16 PM IST

पंचांगानुसार सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 रोजी सूर्य ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. म्हणूनच ती कुंभ संक्रांती म्हणून ओळखली जाईल. संक्रांतीच्या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते आणि सकाळी स्नानानंतर सूर्याला अर्घ्य दिले जाते. या दिवशी गंगेत स्नान, पूजा, जप आणि तपश्चर्या केल्याने मनुष्याला अथांग फळ मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मात कुंभ संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीप्रमाणे या दिवशीही स्नान-ध्यान आणि दान केले जाते.

कुंभ संक्रांतीचे महत्व : ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाच्या राशी प्रवेशाला संक्रांती म्हणतात. ते दर महिन्याला राशी बदलतात. त्यामुळे दर महिन्याला एक ना एक संक्रांत येते. धार्मिक ग्रंथांनुसार सूर्य देव जेव्हा एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात आणि ज्या राशीत सूर्य ग्रह प्रवेश करतात ती त्याच राशीची संक्रांती असते. कुंभसंक्रांतीच्या वेळी गायींचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच गंगेत स्नान करणे खूप शुभ मानले जाते. कुंभसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि नियमानुसार उपवास केला जातो. संक्रांत तिथी ही पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशीइतकीच महत्त्वाची आहे.

कुंभ संक्रांती 2023 शुभ मुहूर्त : 13 फेब्रुवारी 2023 रोजी कुंभ संक्रांती साजरी केली जाईल. कुंभसंक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी ७.२५ पासून सुरू होईल आणि तो सकाळी ९.५७ पर्यंत राहील. पुण्यकाळ मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे २ तास ५५ मिनिटे असेल.

कुंभ संक्रांतीच्या दिवशी दानाचे महत्त्व : मकर संक्रांतीप्रमाणेच कुंभ संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची परंपरा आहे आणि असे केल्याने विशेष फळ मिळते. संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. तसेच आयुष्यातील सगळे दुख-दारिद्र्य दूर होते. एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा पुजारीला दान करा. तुम्ही धर्मादाय म्हणून अन्नपाणी देऊ शकता आणि तुमच्या क्षमतेनुसार कपडे दानही करू शकता.

Kumbh Sankranti 2023 Puja Vidhi : कुंभसंक्रांतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून गंगेत स्नान करण्याची परंपरा आहे. हे शक्य नसेल तर सकाळी लवकर घरी आंघोळ करावी. स्नानानंतर पाण्यात गंगेचे पाणी आणि तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर मंदिरात दिवा लावावा. भगवान सूर्याच्या 108 नावांचा जप करा आणि सूर्य चालीसा वाचा. पूजेनंतर ते साहित्य एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा पुजारीला दान करा. तुम्ही धर्मादाय म्हणून अन्नपाणी देऊ शकता आणि तुमच्या क्षमतेनुसार कपडे दानही करू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.