ETV Bharat / bharat

Kulgam Encounter : कुलगाममध्ये लष्कराची मोहीम फत्ते! एका दहशतवाद्याचा खात्मा - कुलगाम दहशतवादी न्यूज

जम्मू काश्मीरमधील कुलगामच्या मुनंद भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. माहितीच्या आधारे परिसरात रविवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला.

Kulgam Encounter
जम्मू-कश्मीर
author img

By

Published : Jul 25, 2021, 9:17 AM IST

जम्मू - जम्मू काश्मीरमधील कुलगामच्या मुनंद भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली.

मुनंद भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. माहितीच्या आधारे परिसरात रविवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. यावर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

शनिवारीही सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुमलार अरागाम परिसरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला होता. जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टर येथे 23 जुलै 2021 रोजी झालेल्या कारवाईत कृष्णा वैद्य या जवानाला वीरमरण आले आहे.

गेल्या सात महिन्यात 88 पेक्षा अधिक अतिरेकी ठार -

2021 मध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 88 पेक्षा अधिक अतिरेकी ठार मारले आहेत. यातील एकट्या जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात 16 जणांना कंठस्नान घातले. आतापर्यंत दहशतवाद संबंधित विविध घटनांमध्ये सुरक्षा दलातील 19 जवान हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात शांती प्रस्थापित करणं अवघड आहे. पाकिस्तान आणि फुटिरतावादी या दोन घटकांमुळे या भागात कायम तणाव राहिला आहे. खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून करण्यात येत आहेत. मात्र, दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बऱ्याच दहशतवाद्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणही केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.