ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये चकमकीनंतर दोन दहशतवादी शरण - 2 LeT Militants surrendered

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकक सुरू होती. यानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. हे दोनही दहशतवादी स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kulgam Encounter: 2 LeT Militants surrendered
जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये चकमकीनंतर दोन दहशतवादी शरण
author img

By

Published : Dec 22, 2020, 7:40 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकक सुरू होती. यानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. हे दोनही दहशतवादी स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुटुंबीयांच्या आवाहनानंतर आत्मसमर्पण..

या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचा इशारा दिला. यासाठी त्यांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांचीही मदत घेतली. अखेर कुटुंबीयांच्या आवाहनानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. कुलगामच्या तोंगडौनू भागामध्ये ही चकमक घडली.

शस्त्रास्रे जप्त..

हे दोघे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

गेल्या आठवड्यातही एक दहशतवादी पकडला..

यापूर्वी १७ डिसेंबरला करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले होते. तर दुसरीकडे, याच दिवशी पंजाबमधील अटारी सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.