ETV Bharat / bharat

IPL 2023 : राजस्थानने कोलकात्याचा नऊ गडी राखून केला पराभव

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव केला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून इडन गार्डन्सवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 13.1 षटकात 1 गडी गमावत 151 धावा करत सामना जिंकला.

KKR vs RR IPL 2023 LIVE
KKR vs RR IPL 2023 LIVE
author img

By

Published : May 11, 2023, 9:59 PM IST

Updated : May 11, 2023, 10:54 PM IST

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: आयपीएलच्या 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ विकेट्सने पराभव केला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून इडन गार्डन्सवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 13.1 षटकात 1 गडी गमावत 151 धावा करत सामना जिंकला. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालने नाबाद 98 आणि कर्णधार संजू सॅमसनने नाबाद 48 धावा केल्या.

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: राजस्थान रॉयल्सने 5 षटकांनंतर धावसंख्या (68/1) पोहचली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने दिलेल्या अवघ्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात झाली आहे. 5 षटकांअखेर यशस्वी जैस्वाल (62), संजू सॅमसन (2) धावा करत क्रीजवर उपस्थित आहेत.

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: यशस्वी जैस्वालने IPL मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकून राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. जैस्वाल हा आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 13 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न करतांना जोस बटलर (0) आंद्रे रसेलच्या भयानक थ्रोवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सची 2 षटकांनंतर धावसंख्या (40/1) पोहचली आहे.

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट: २० षटकांनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोअर (१४९/८)

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट : प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 149 धावा केल्या. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. केकेआरच्या चहलने सामन्यातील पहिली विकेट घेताच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. चहलच्या नावावर आता 143 सामन्यांत 187 विकेट्स आहेत, जे आयपीएलमध्ये कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स आहेत.

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट : केकेआरचा कर्णधार नितीश राणा यांच्या नेतृत्वात चहल सामन्यातील पहिली विकेट घेताच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. चहलच्या नावावर आता 143 सामन्यांत 187 विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये इतर कोणत्याही गोलंदाजाने एव्हढ्या विकेट्स घेतलेल्या नाहीत.

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 16 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जो रूटकडे झेलबाद केले. कोलकाता नाईट रायडर्स 19 षटकांनंतर धावसंख्या (142/7) पोहचली आहे.

KKR vs RR लाइव्ह मॅच अपडेट : राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने व्यंकटेश अय्यरला 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्धशतक खेळत 57 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर ट्रेंट बोल्टकडे झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने शार्दुल ठाकूरला (1) एलबीडब्ल्यू आऊट केले. कोलकाता नाईट रायडर्स 17 षटकांनंतर धावा (116/6) केल्या आहेत.

कोलकाता : IPL 2023 चा 56 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्स कोलकाता येथे खेळला जात आहे. राजस्थान आणि कोलकाता या दोन्ही संघांनी 11 पैकी 5 सामने जिंकले असून दोघांचे 10-10 गुण आहेत. दोन्ही संघ हा सामना जिंकून 2 गुण मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा बळकट करण्याचा प्रयत्न करतील. या हंगामात दोन्ही संघांमध्ये होणारा हा पहिलाच सामना आहे. उभय संघांमधला शेवटचा सामना 2022 साली खेळला गेला होता ज्यात KKR ने राजस्थानचा 7 गडी राखून पराभव केला होता. स्टार फलंदाज IPL मध्ये पहिल्यांदाच सामनावीर ठरला होता. दोन्ही संघ कागदावरच शिल्लक असल्याचे दिसून येत आहे, अशा परिस्थितीत आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग-11 कोलकाता नाईट रायडर्सचे रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

बदली खेळाडू: सुयश शर्मा, वैभव अरोरा, एन जगदीसन, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन

राजस्थान रॉयल्स प्लेइंग-11 यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

बदली खेळाडू: डोनाव्हॉन फरेरा, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, मुरुगन अश्विन, नवदीप सैनी

Last Updated : May 11, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.