मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत सीबीआय आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करणार आहे. राज्यातील 15 दिवसांचे लॉकडाऊन आजपासून सुरू होत आहे.
सीबीआय करणार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी
मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय आज चौकशी करणार आहे. यापूर्वीच सीबीआयने त्यांना समन्स पाठवलं आहे.
महाराष्ट्रात आजपासून 15 दिवस लॉकडाऊन
मुंबई - राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू राहणार आहे. या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक वगळता संपूर्ण संचारबंदी राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असले तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना फक्त परवानगी देण्यात आली आहे.
सनराईजेस हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजस बंगलोरमध्ये सामना
मुंबई- सनराईजेस हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजस बंगलोरमध्ये आज आयपीएलचा सामना रंगणार आहे. हा आयपीएलमध्ये सहावा सामना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना थेट स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. मात्र, प्रेक्षक घरी बसूनच आयपीएलचे सामने पाहत आहेत.
दोन दिवसात मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अंदाज
नवी दिल्ली - 4 येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, विदर्भासह काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर येत्या चार ते पाच दिवसांमध्ये देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
लसीकरण महोत्सवाचा आज शेवटचा दिवस
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत लसीकरण महोत्सवाची घोषणा केली होती. देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे चर्चा करताना लसीकरण महोत्सवाची घोषणा केली होती. या लसीकरण महोत्सावाचा आज शेवटचा दिवस आहे.
काँग्रेस काढणार युट्यूब न्यूज चॅनेल
नवी दिल्ली- काँग्रेसने स्वतंत्र पक्षाचे युट्यूबवर न्यूज चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे न्यूज चॅनेल आज लाँच होणार आहे. त्यामध्ये पक्षाशी निगडीत बातम्या समाज माध्यमातून दाखविल्या जाणार आहेत.
आर्किटेक्चर कौन्सिलच्या परिक्षेचा निकाल
मुंबई- आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांमध्ये पदवीधर अभ्यासक्रमांसाठी चालू वर्षात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. सीओएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एनएटीए 2021 च्या पहिल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.
OnePlus 8 Pro आज होणार भारतात लॉन्च
नवी दिल्ली- वनप्लस 8 सीरीज हा भारतात आज लाँच होणार आहे. विशेष म्हणजे जगात पहिल्यांदाच भारतात हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. त्यानंतर चीन व इतर जगभराती बाजारांमध्ये वनप्लस ८ प्रो लॉन्च होणार आहे.
मेगाबजेट सालार आज झळकणार
नवी दिल्ली- बाहुबली फेम प्रभासचा मेगाबजेट सिनेमा सालार आज जगभरात प्रदर्शित होणार आहे. सिनेमा कंपनी होम्बले फिल्म्सकडून हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभासबरोबर श्रुती हसन दिसणार आहे. सालार या सिनेमाचे विजय किरंगदूर हे निर्माते तर दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.
चार सार्वजनिक बँकांचे होणार खासगीकरण, दोन बँकांचा निर्णय आज
नवी दिल्ली- मोदी सरकारकडून सार्वजनिक बँकांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात किमान दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्यात येण्याची शक्यता आहे. सुत्राच्या माहितीनुसार नीती आयोग, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बँकांच्या खासगीकरणाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती-
मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. मात्र, कोरोनाची लाट असल्याने जयंतीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करता येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब यांच्या अनुयायांना घरी राहून जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.