ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : 'या' संघटना विधानभवनावर काढणार मोर्चा - Todays Top News in Marathi

22 डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कमालीचा वाद झाला. हिवाळी अधिवेशाचा आजचा पहिला दिवस आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav mimicry of PM narendra modi ) यांनी पंतप्रधान मोदींच्या केलेल्या नकलेमुळे चांगलाच गाजला. एसटी संपावर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये ( Bombay High Court on ST strike ) सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अनिश्चितकालीन दुखवटा कोणालाही करता येणार नाही, असे खडेबोल न्यायालयाने कर्मचाऱ्यांना सुनावले आहे.

Todays Top News in Marathi
Todays Top News in Marathi
author img

By

Published : Dec 23, 2021, 4:44 AM IST

नवी दिल्ली - जाणून घेऊ, २२ डिसेंबरच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि २३ डिसेंबरला महत्त्वाच्या होणाऱ्या घटनांची माहिती. आजचा कसा असेल दिवस, याची माहिती घेऊ.

22 डिसेंबर रोजीच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई - आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाच्या रद्द केलेल्या परीक्षा ( Health Department Exam ) प्रकरणाची चौकशी करण्याबाबत प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत ( Maharashtra Council Winter Session 2021 ) प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) यांनी याबाबत सरकार गंभीर असून गरज भासल्यास या पूर्ण प्रकरणाची माजी निवृत्त मुख्य सचिवांद्वारे चौकशी करण्याचे सांगितले. सविस्तर वाचा-

मुंबई - हिवाळी अधिवेशाचा आजचा पहिला दिवस आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav mimicry of PM narendra modi ) यांनी पंतप्रधान मोदींच्या केलेल्या नकलेमुळे चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी आक्रमक भुमिका घेत जाधवांच्या निलंबनाची मागणी केली. सविस्तर वाचा-

हैदराबाद - महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चार चाकी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेले हे दिमाखदार वाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या प्रयोगाबाबत 'ईटीव्ही भारत'ने 20 डिसेंबरला वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर त्यांच्या सर्जनशीलतेची दखल आता महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून त्यांना बोलेरो वाहन ऑफर केले आहे. सविस्तर वाचा-

मुंबई - एसटी संपावर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये ( Bombay High Court on ST strike ) सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अनिश्चितकालीन दुखवटा कोणालाही करता येणार नाही, असे खडेबोल न्यायालयाने कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, अनिश्चित काळ दुखवटा पाळता येणार नाही. त्यामुळे, जे कामगार हजर होत नाही, त्यांच्या विरोधात अवमान याचिकेतील तरतुदीची माहिती एसटी आगारात लावावीत, असे थेट आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, आजची सुनावणी राखून ठेवत पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. सविस्तर वाचा-

सांगली - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन ( Shivaji statue desecration Case ) कर्नाटकातील बंगळुरु येथे करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या शिवसैनिकांनी ( Sangli Shivsena Agitation ) थेट कर्नाटकच्या सीमेवर ( Karnataka State Border ) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह कन्नड रक्षिका वेदिका संघटनेच्या ध्वजाचे दहन केले. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर वाचा-

या महत्त्वाच्या घटनांवर असणार नजर-

1) यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. T20 विश्वचषकानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना ( India Pakistan cricket match ) पाहायला मिळणार आहे. भारत 23 डिसेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 23 तारखेला भारत विरुद्ध UAE सामना रंगणार आहे.

2) आरोग्य विभागातील पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी बीडच्या पाटोद्यातील भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय सानप ( Sanjay Sanap arrest in paper leak ) यांना पोलिसांनी अटक केलेय. त्यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

3) अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्ज थकल्यामुळे बँकांनी आमच्यापाठी तगादा लावला आहे. काही बँकांनी मालमत्ता जप्तीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कोकणातील बागायतदारांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर येत्या २३ डिसेंबरला आंबा बागायदारांकडून धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे.

4) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar on agitation ) 23 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरीकल डेटा नसल्याने ओबीसी राजकीय आरक्षण देता येणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ओबीसींच्या जाती निहाय जणगणनेसाठी 23 डिसेंबरला विधान भवन वर मोर्चा काढणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

5) हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवर घेरण्याचा प्रयत्न असणार आहे.

असा असेल तुमचा दिवस

VIDEO : 23 December Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

23 December Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज विदेश प्रवास घडेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aajchi Prerna : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.