मुंबई : पेट्रोल डिझेल ही मुख्यतः वाहतुकीच्या उद्देशाने एक आवश्यक वस्तू (Petrol Diesel Rates Today) आहे. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर ( petrol diesel rate today 2 January 2023 ) काय आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा भारतात इंधनाच्या किमती ( Petrol Diesel Rates In Maharashtra ) वाढतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 48 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 99 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 51 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 02 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 30 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 80 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 55 पैसे (Petrol Rates Today) आहे.
इंधनाची किंमत : तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडते तेव्हा त्याची मूळ किंमत नक्की केली ( Petrol Diesel Rates Today) जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला (Diesel Rates Today) जातो.