मुंबई: आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गोलाल डोडी हे त्याचे गाव होते. आता त्या गावाला सेवागड नावाने ओळखतात. सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. बंजारा समाज त्यांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. बंजारा समाज हा सर्व व्यापारी भारतातील बड्या राजांना आणि सम्राटांना अन्नधान्य पुरवत असत. पण सर्वसामान्यांची चिंता ही गौर बंजारा समाजातील संत सेवालाल महाराजांची होती. त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी व त्यांच्या कल्याणकारी विचारांची स्थापना केली.
समाजाला दिशा देण्याचे कार्य केले: सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड या गावी त्यांची समाधी आहे. आध्यात्मिक व समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे. बंजारा समाजातील शुर पराक्रमीच्या इतिहासाच्या शौर्यगाथा आज देखील लोकसाहित्यामधून दिसून येते.
संत सेवालाल महाराज यांची शिकवण: जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका, सन्मानाने आयुष्य जगा, इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करु नका, स्त्रियांचा सन्मान करा, काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा, पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणी द्या आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे पाप आहे, वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा, मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा, माणुसकीवर प्रेम करा, आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा, कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका, धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली.
जयंती शासन स्तरावर साजरी: संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण, गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र तसेच तेलंगानात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध लढा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
हेही वाचा: Rang Panchami 2023 वर्ष 2023 मध्ये कधी आहे रंगपंचमी का साजरा केला जातो हा सण