ETV Bharat / bharat

Pernem Constituency Election 2022: पेडणे राखीव मतदारसंघात कोणाचे ठरणार पारडे जड, जाणून घ्या मतदारसंघाची स्थिती

राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सध्या पेडणे मतदारसंघाचे ( Pernem constituency MLA Babu Ajagaonkar ) आमदार आहेत. पेडणे राखीव मतदार संघाचा आमदार होण्यासाठी किमान नऊ जण इच्छुक आहेत. त्यात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर ( Mission for Local Rajan Korgaonkar ) , महाराष्ट्र गोमंतकचे नेते प्रवीण आर्लेकर ( Maharashtra Gomantak leader Pravin Arlekar ) , शिवसेनेतर्फे सुभाष केरकर आदी इच्छुक आहेत. जाणून घेऊ, पेडणे मतदारसंघाची स्थिती.

गोवा विधानसभा निवडणूक
गोवा विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Dec 17, 2021, 4:57 PM IST

Updated : Dec 17, 2021, 5:25 PM IST

पणजी - महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर पेडणे हा मतदारसंघ आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला हा प्रदेश आहे. मतदारसंघात एक बाजूला उंच डोंगररांगा आणि त्यातून वाहणारी तेरेखोल नदी आहे. आगामी पेडणे मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त ( Pernem constituency election 2022 ) सद्यस्थिती जाणून घेऊ.

राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सध्या पेडणे मतदारसंघाचे ( Pernem constituency MLA Babu Ajagaonkar ) आमदार आहेत. पेडणे राखीव मतदार संघाचा आमदार होण्यासाठी किमान नऊ जण इच्छुक आहेत. त्यात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर ( Mission for Local Rajan Korgaonkar ) , महाराष्ट्र गोमंतकचे नेते प्रवीण आर्लेकर ( Maharashtra Gomantak leader Pravin Arlekar ) , शिवसेनेतर्फे सुभाष केरकर , गोवा फॉरवर्डचे जितेंद्र गावकर, काँग्रेसचे विठू मोरजकर, कांता जाधव, आम आदमीतर्फे विकेश असोटीकर अशी इच्छुकांची यादी वाढत आहे.

जाणून घ्या मतदारसंघाची स्थिती
जाणून घ्या मतदारसंघाची स्थिती

हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : डिचोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, काँग्रेस कमकुवत

मतदारसंघातील राजकीय परिस्थिती

मतदार संघातून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा विजय रोखण्यासाठी स्थानिक भाजपचे मुळ व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते कार्यरत आहेत. तर दुसऱ्या बाजूने भाजपच्या तिकिटावर निवडणूक ‘मिशन फॉर लोकल’ चे राजन कोरगावकर यांना उमेदवारी देवून त्यांनी ती लढवावी असे म्हणणारा गट कार्यरत आहे.

हेही वाचा-Panaji Assembly Election 2022 : राजधानी पणजी जिंकण्यासाठी भाजपातच चुरस; 'अशी' आहे मतदारसंघाची स्थिती

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि मंत्री मायकल लोबो यांच्यातील वाद अनेकवेळा माध्यमातून समोर आले होते. महाराष्ट्र गोमंतकचे प्रवीण आर्लेकर हे लोबो यांचे समर्थक आहेत. त्यांना मंत्री मायकल लोबो यांच्याकडून पाठिंबा मिळत आहे.
अशी आहे मतदारांची संख्या

  • एकूण मतदार – ३२,८२४
  • पुरुष मतदार – १६,४३७
  • महिला मतदार – १६,३८७

मतदारसंघात समाविष्ट पंचायती : कोरगाव, खाजने-अमेरे-पोरस्कडे, वारखंड- नागझर, तांबोसे- मोप-उगवे, तोरसे, विर्नोडा, धारगळ, कासारवर्णे, चांदेल-हसापूर, वझरी, हळर्ण, इब्रामपूर-हणखणे तसेच पेडणे नगरपालिका क्षेत्राचा मतदारसंघात समावेश आहे.

हेही वाचा-पणजी : बाबूंश मोंसरात विरुद्ध उत्पल पर्रीकर; : मनोहर पर्रीकरांच्या पुत्राचा भाजपला इशारा

2017 ची विधानसभा
2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे बाबू आजगावकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे तत्कालीन आमदार राजेंद्र आरलेकर यांचा पराभव केला. आजगावकर यांना 15, 745 तर आरलेकर यांना 9, 175 मते मिळाली होती. 2019 ला बाबू आजगावकर भाजपवासी झाले आहेत. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री आहेत.

मतदारसंघातील समस्या
पेडणे मतदारसंघ आजवर उपेक्षितच राहिला. विकासाची केवळ दिवास्वप्न दाखवून नेतेमंडळींनी दिशाभूल केली आहे. या मतदार संघात वीज, पाणी, रोजगार या प्रमुख समस्या असून आजवरच्याा लोकप्रतिनिधींनी लोकांचा केवळ मतदानापुरता उपयोग करून घेतला. त्या्मुळे मतदारसंघातील जनता अद्यापही सुविधांपासून वंचित आहे.

प्रमुख उद्योग व व्यवसाय
मतदारसंघात शेती, पर्यटन , खाणकाम, रेती व्यवसाय हे प्रमुख उद्योग आहेत . तर नव्याने विकसित करण्यात येणारे मोपा विमानतळ, क्रीडानगरी, आयुष इस्पिितळ, आयटी पार्क आदी नियोजित प्रकल्पांेमुळे लोकांच्याा आशा पल्लवित झाल्या. आहेत. आतातरी विकासाची संधी लाभेल, असे इथल्या स्थानिक लोकांना वाटत आहे.Conclusion:

Last Updated : Dec 17, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.