मुंबई : क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. बिटकॉइन हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले (Cryptocurrency Prices Today) आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.
ऑनलाईन उपलब्ध : कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करत आहे.
क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 14,15,789 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,05,031 रूपये आहे. बायनान्सची किंमत 23,875 रूपये आहे.