हिंदू धर्मात पूजा पाठला विशेष महत्त्व आहे. आपण सर्वचजण आपापल्या दिवसाची सुरुवात पूजा आणि उपासनेनंतरच करतो. सनातन धर्मात आंघोळ केल्यावर देवासमोर नतमस्तक होणे बंधनकारक आहे. पूजा पाठ करणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांच्या नियमांचे पालन करणे (pooja rules and rituals) देखील महत्वाचे मानले जाते. गुरुवार हा गुरुचा दिवस असतो. आज आपण जाणुन घेऊया गुरुवारची विशेष पूजा (Thursday Worship) कशी करावी.
1. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून केळीच्या झाडाची पूजा करावी. मूठभर भिजवलेले चने आणि गुळ केळीच्या झाडाच्या मुळामध्ये अर्पण करावेत. हा उपाय सतत पाच किंवा सात गुरुवार करावा. यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतील.
2. याशिवाय तुमच्या कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तर तुम्ही गुरुवारी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद मिसळून प्यावी. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने गुरूला बळ मिळते आणि हा रंग भगवान विष्णूलाही प्रिय असल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो.
3. एका हाताने कधीही देवापुढे नमन करु नका. यासह पूजा झाल्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर, झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला कधीही स्पर्श करु नका. कधीही संध्याकाळच्या वेळी तुळशीचे पान तोडू नये. खासकरुन संक्रांत, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करु नये.
4 पूजेच्या वेळी गुरु मंत्राचा जप करावा. जप करताना जीभ हलवू नये. जप करताना उजव्या हाताला कपड्याने झाकून जप केला पाहिजे. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मंत्राचे उच्चारण स्पष्टपणे करावे.
5. हळद, पिवळी मोहरी, पिवळे वस्त्र, साखर, मीठ, सोनं, पिवळी फुले, गुरुचे स्तोत्र, केशर,पपई इत्यादी वस्तू एखाद्या गुरुवारी देवळात जाऊन ब्राम्हणास यथाशक्ती दान कराव्यात व आशिर्वाद घ्यावा. यामुळे सुख समृद्धी (happiness and prosperity in house) वैभव राहते. सोबतच लक्ष्मी प्रसन्न राहते आणि बौद्धीक गुणवत्तेतही वाढ होते.
6. कधीही एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. याशिवाय यज्ञ आणि श्राद्धात काळे तीळ वापरावे. पूजेच्या वेळी आपल्या डाव्या बाजूला तूपांचा दिवा लावा आणि देव-देवतांना उजव्या बाजूला ठेवा. तसेच, तांदळाच्या राशीवर दिवा लावावा.
7. पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा. पाणी, शंख आणि पूजा सामग्री आपल्या उजव्या बाजूला ठेवा. त्याच वेळी, घंटी आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा. तसेच गुरुचरित्राची किमान १२ पारायणे करणे आणि १३ ब्राम्हणाकडून करून घेणे. दत्तबावनी नित्य वाचणे. सत्यदत्त पोथी किमान १ वर्ष वाचणे, गुरू ग्रहाचा १९ हजार वेळा जप करणे, स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोथी नित्य वाचावी. गुरुगीता नित्य वाचावी. यामुळे देखील बौध्दिक वृद्धी होईल आणि करियरसाठी योग्य दिशा प्राप्त होईल.
( Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ETV BHARAT त्याची पुष्टी करत नाही.)