अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण वासंतीबेन यांना संपूर्ण देश ओळखतो. पण पंतप्रधान मोदींना एक पाकिस्तानची बहीणही आहे. पंतप्रधान मोदींची पाकिस्तानी बहीण कमर जहाँ या वर्षीही त्यांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत येणार आहे. विशेष म्हणजे, त्या गेली 35 वर्षे मोदींना स्वत:च्या हाताने राखी बांधत आहेत. (Rakshabandhan 2023) (PM Narendra Modi Pakistani Sister)
दरवर्षी हाताने बनवलेली राखी बांधतात : पंतप्रधान मोदींची पाकिस्तानी बहिण कमर जहाँ यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. 'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना 35 वर्षांपासून ओळखतो. डॉ. स्वरूप सिंह गुजरातचे राज्यपाल होते. त्यावेळी राज्यपालांनी मला त्यांची मुलगी मानले होते. राज्यपालपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते गुजरात सोडत असताना आम्ही त्यांना अहमदाबाद विमानतळावर भेटायला गेलो. नरेंद्र मोदी तेव्हा संघाचे कार्यकर्ते होते. तेही तेथे उपस्थित होते. नरेंद्र मोदी राज्यपालांसोबत बसले होते. तेव्हा राज्यपाल म्हणाले की, ही माझी मुलगी आहे. आता मी तिला तुमच्या स्वाधीन करतो. तेव्हापासून नरेंद्र मोदी मला बहिण मानतात. मी दरवर्षी माझ्या हाताने बनवलेली राखी नरेंद्र मोदींना बांधते', असे कमर जहाँ यांनी सांगितले.
दिल्लीला जाऊन राखी बांधणार : 'आज ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. मला याचा खूप अभिमान आहे. मी नरेंद्र मोदींना ते सामान्य कार्यकर्ता असल्यापासून ओळखते. त्यांनी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी किती धडपड केली हे मला चांगलं माहीत आहे', असं कमर जहाँ म्हणाल्या. 'दरवर्षी मी नरेंद्र मोदींना राखी बांधते. यावेळीही मी दिल्लीला जाऊन त्यांना हाताने बनवलेली राखी बांधणार आहे', असे त्यांनी सांगितले.
मोदींना हाताने बनवलेल्या राख्या आवडतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाताने बनवलेल्या राख्या आवडतात. म्हणून कमर जहाँ दरवर्षी त्यांच्यासाठी हाताने राखी विणतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही कमर जहाँ स्वतः जाऊन राखी बांधायच्या.
हेही वाचा :