ETV Bharat / bharat

CDS Bipin Rawat : कोण होते सीडीएस बिपिन रावत? जाणून घ्या...

हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात आज देशाचे सीडीएस बिपिन रावत यांचा मृत्यू (CDS Bipin Rawat passes away) झाला आहे. यात त्यांच्या पत्नीसह अन्य लष्कर अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे.

cds bipin rawat
सीडीएस बिपिन रावत
author img

By

Published : Dec 8, 2021, 4:07 PM IST

Updated : Dec 8, 2021, 6:41 PM IST

नवी दिल्ली - हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला आज तामिळनाडूत अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत हे होते. या अपघातात बिपिन रावत यांच्यासह इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम बिपिर रावत यांच्याकडे होते.

  • बिपिन रावत यांचे शिक्षण -

बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बिपिन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा डेहराडूनला आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

  • भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ -

31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला होता. यापूर्वी भारताचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत सप्टेंबर 2016 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. 2016 मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते कार्यभार पाहत होते. त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचे नेतृत्व देखील रावत यांनी केले आहे. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे.

लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर 1978 मध्ये सैन्यात दाखल झाले. '11 गोरखा रायफल्स'च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती. 1986 मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा सांभाळली. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती.

  • बिपिन रावत यांना मिळालेले सन्मान -

बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Last Updated : Dec 8, 2021, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.