ETV Bharat / bharat

Bindeshwar Pathak : घरात टॉयलेट नव्हते, त्यातून प्रेरणा घेत बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड, जाणून घ्या कोण होते बिंदेश्वर पाठक - know about Bindeshwar Pathak

बिहारमधील एका गावातून जगभर प्रसिद्धी मिळवणारे थोर समाजसुधारक बिंदेश्वर पाठक आता या जगात नाहीत. मंगळवारी दुपारी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाठक यांनी आयुष्यात संघर्ष करून असे कार्य केले, ज्यासाठी येणाऱ्या पिढ्या त्यांना कायम स्मरणात ठेवतील. जाणून घ्या सुलभ शौचालयाच्या सुरुवातीपासून ते त्याची इंटरनॅशनल ब्रँड बनण्याची कहाणी..

Bindeshwar Pathak
बिंदेश्वर पाठक
author img

By

Published : Aug 15, 2023, 6:31 PM IST

Updated : Aug 15, 2023, 8:04 PM IST

नवी दिल्ली : सुलभ शौचालयाच्या माध्यामातून क्रांती घडवून आणणारे बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी दिल्लीत निधन झाले. त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीमुळे संपूर्ण देशात बदल घडला. त्यांनीच एकदा सांगितले होते की, त्यांच्या लहानपणी घरात शौचालयाची सोय नव्हती. याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी या व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन ती पूर्णपणे बदलून टाकली. मात्र ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नव्हती.

लहानपणी घरात शौचालय नव्हते : बिंदेश्वर पाठक यांचा जन्म २ एप्रिल १९४३ रोजी ब्राह्मण कुटुंबात झाला. ज्या घरात ते आपल्या कुटुंबासह राहत होते, तेथे राहण्यासाठी ९ खोल्या होत्या, मात्र शौचालय नव्हते. घरातील महिला दररोज शौचासाठी बाहेर जात असत. त्यांना सर्वजण उघड्यावर शौचास जाताना दिसायचे. सुलभ शौचालयासारखी योजना साकारण्याची प्रेरणा त्यांना येथूनच मिळाली.

गांधी जन्मशताब्दी उत्सव समितीपासून सुरुवात : बिंदेश्वर पाठक यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून १९६४ मध्ये समाजशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. १९८५ मध्ये त्यांनी पीएचडी मिळावली. १९६८-६९ मध्ये त्यांना बिहार गांधी जन्मशताब्दी उत्सव समितीमध्ये सुरक्षित आणि परवडणारी शौचालये विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. तेथून त्यांनी सुलभची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी समाजात स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती सुरू केली आणि देश स्वच्छ करण्यासाठी ते सतत काम करू लागले.

१९७० मध्ये सुलभ इंटरनॅशनलची स्थापना : त्यावेळी हाताने सफाई आणि उघड्यावर शौचास जाणे या समस्येने समाजात सामान्य होत्या. बिंदेश्वर पाठक यांनी या दोन्ही क्षेत्रात काम सुरू केले. त्यांनी १९७० मध्ये सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली. ही एक सामाजिक संस्था आहे, जी प्रामुख्याने मानवी हक्क, पर्यावरण, स्वच्छता आणि शिक्षण क्षेत्रात काम करते. त्यांना त्यांच्या कामाबद्दल कोणी विचारले असता, ते मला गांधींचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे सांगायचे. या सोबतच बिंदेश्वर पाठक यांची उत्तम वक्ता आणि उच्च दर्जाचे लेखक म्हणून एक वेगळी ओळख आहे.

सुलभ शौचालय हा आंतरराष्ट्रीय ब्रँड बनला : सुलभ शौचालयाच्या स्थापनेसाठी त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बिंदेश्वर पाठक यांनी २००१ मध्ये जागतिक शौचालय दिनही साजरा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९ नोव्हेंबर २०१३ मध्ये सुलभ शौचालयाला संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक दर्जाची मान्यता मिळाली. सुलभ शौचालयाच्या देशातच नव्हे तर परदेशातही शेकडो शाखा आहेत. पाठक यांनी आपल्या मेहनतीने हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवला. गेली तीन दशके ते दिल्लीत कायमचे वास्तव्य करत होते. सुलभ इंटरनॅशनलचे मुख्य कार्यालय पश्चिम दिल्ली येथे आहे.

हेही वाचा :

  1. Bindeshwar Pathak : सुलभ शौचालयाच्या माध्यमातून क्रांती घडणून आणणारे बिंदेश्वर पाठक यांचे निधन

Last Updated : Aug 15, 2023, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.