जोधपूर- अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याच्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता मुंबई पोलीस जोधपूरमध्ये पोहोचले. मात्र, जोधपूर जिल्ह्यातील कुडी भगतासानी पोलिसांनी तपास करू न दिल्याचा मुंबई पोलिसांनी आरोप केला. राजस्थानच्या पोलिसांनी तपासात अडथळा आणल्याचही मुंबई पोलिसांनी म्हटले. महाराष्ट्र पोलिसांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याचा राजस्थान पोलिसांनी दावा केला. जर काही अनुचित प्रकार घडला असता तर ती पोलीस ठाण्याची जबाबदारी होती, असंही राजस्थान पोलिसांनी म्हटलं आहे.
मुंबई एमपीडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड म्हणाले, आरोपी आणि अल्पवयीन मुलगा कुडी भगतासानीमधील एका घरात असल्याचं फोनवरून लोकेशन समजून आले. त्यामुळे तपास करण्याकरिता पोलीस येथे पोहोचली. मात्र, त्यापूर्वीच आरोपी पळून गेला. गेली दोन दिवस आरोपीनं अल्पवयीन मुलाला १० दिवस एका घरात ठेवलं होते. या घराची फोन लोकेशनवरून माहिती काढत मुंबई पोलिसांनी घरमालकाला प्रतापनगर ठाण्यात बोलाविलं. मात्र, घरमालकानं प्रतापनगर पोलीस ठाण्यात न येता थेट कुडी भगतासनी पोलीस ठाणे गाठले. महाराष्ट्र पोलीस त्रास देत असल्याची घरमालकानं पोलीस ठाण्यात तक्रार केली.
दोन महिन्यांपूर्वी एमपीडीसी ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाचं अपहरण झालं. या मुलाला वडील नाहीत. त्याची आई एका दूरसंचार कंपनीत नोकरी करते. अल्पवयीन मुलगा हा जोधपूरमध्ये असल्याचे फोन लोकेशनवरून समजले. तर आरोपी जालोर येथील रहिवाशी असल्याची माहितीदेखील समोर आली- मुंबई एमपीडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड
अल्पवयीन मुलाच्या आईनंही मुंबई पोलिसांची घेतली बाजू- कुडी पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून गैरवर्तणूक केल्याचा मुंबई पोलिसांनी आरोप केला. एवढेच नव्हे तर आरोपींना प्रश्न विचारू दिले नाही. आरोपीला अटक करण्यासाठी नव्हे तर केवळ चौकशी करण्यासाठी आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. यावेळी मुंबई पोलिसांसमवेत अल्पवयीन मुलाची आईदेखल होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारपर्यंत मिळेल. मात्र, तोपर्यंत पोलिसांना आरोपीची चौकशी करू दिली जात नाही.
कागदपत्रांशिवाय चौकशीची परवानगी नाही-कुडी ठाण्याचे पोलीस देवेंद्र सिंह देवडा म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांशी कोणतीही गैरवर्तणू करण्यात आली नाही. त्यांच्याकडं चौकशीबाबतचे कागदपत्रे मागितले. मात्र, त्यांच्याजवळ काहीही नव्हते. काही दिवसांपासून महाराष्ट्राचे पोलीस त्रास देत असल्याचा पीडित व्यक्तीनं आरोप केला होता. घरमालकाची तब्येत खराब होऊ लागल्यानंतर मुंबई पोलिसांना कागदपत्र आणण्याचे सांगितले. त्याशिवाय चौकशीची परवानगी देण्यात येणार नाही.
हेही वाचा-