ETV Bharat / bharat

Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या - Khalistan

भारत सरकारने दहशतवादी घोषित केलेले खालिस्तान समर्थक नेते हरदीपसिंग निज्जर यांची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर पंजाबमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता.

Hardeep Singh Nijjar
हरदीपसिंग निज्जर
author img

By

Published : Jun 19, 2023, 4:23 PM IST

चंदीगड : खलिस्तान समर्थक नेते हरदीपसिंग निज्जर यांची कॅनडामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या मारून हत्या केली. त्यांना भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. ते गुरू नानक शीख गुरुद्वाराचे अध्यक्ष होते. जालंधरमधील एका खेड्यातील रहिवासी असलेल्या निज्जर यांचा भारतात बंदी असलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या फुटीरतावादी संघटनेशी संबंध होता. ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी सार्वमत घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पंजाबमधील शांतता बिघडवण्याचा कट रचला : 31 जानेवारी 2021 रोजी जालंधर येथे हिंदू पुजारी कमलदीप शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या वर्षी निज्जरसह चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात कमलजीत शर्मा आणि राम सिंह यांचा समावेश आहे, ज्यांनी निज्जर आणि त्याचा सहकारी अर्शदीप सिंह उर्फ ​​प्रभा यांच्या सूचनेवरून पुजारीवर हल्ला केला होता. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपी अर्शदीप आणि निज्जर यांनी हिंदू पुजाऱ्याची हत्या करून पंजाबमधील शांतता बिघडवण्याचा आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा कट रचला होता.

पंजाब पोलिसांनी केली होती प्रत्यार्पणाची मागणी : पंजाबमधील दहशतवादी कारवायांमध्ये निज्जर यांचा सहभाग असल्याच्या आरोपावरून भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी, पंजाब पोलिसांनी निज्जर यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. 23 जानेवारी 2015 रोजी जारी केलेल्या लुकआउट परिपत्रक आणि 14 मार्च 2016 रोजी जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या अनुषंगाने पोलीस त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होते.

10 लाखांचा इनाम होता : जुलै 2020 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) निज्जरला 'वैयक्तिक दहशतवादी' घोषित केले होते. एनआयएने सांगितले की, निज्जर भारतात दहशत पसरवण्यासाठी खलिस्तान समर्थक दहशतवादी मॉड्युलची भर्ती, प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि ऑपरेट करण्यात सक्रियपणे सहभागी होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भडकाऊ आणि द्वेषपूर्ण भाषणे देण्यात त्यांचा सहभाग होता. निज्जर यांच्यावर 10 लाखांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या वर्षी रिपुदमन सिंग मलिक यांच्या हत्येचा आरोप होता, जो 1985 मध्ये सरे येथे एअर इंडियाच्या दहशतवादी बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटला होता.

हेही वाचा :

  1. कॅनडात खलिस्तान समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा चालवला चित्ररथ; कॅनडाच्या राजदूताकडून निषेध
  2. Terrorist Paramjit Panjwad killed : मोस्ट वाँटेड दहशतवादी परमजीत सिंग पंजवार लाहोरमध्ये ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.