ETV Bharat / bharat

Khalistani Attacked On Embassy : भारतीय दूतावासांवर हल्लेखोर खलिस्तानींची ओळख पटली, NIA ची टीम तपासासाठी जाणार कॅनडाला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 5:12 PM IST

Khalistani Attacked On Embassy : २ जुलैला खलिस्तानी समर्थकांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. याशिवाय १९ मार्च रोजी खलिस्तान्यांनी इंग्लंडमधील भारतीय दूतावासावरही हल्ला केला होता. एनआयएनं आता या हल्लेखोरांची ओळख पटवली आहे.

NIA
NIA

चंदीगड Khalistani Attacked On Embassy : केंद्र सरकारनं परदेशात देशविरोधी कार्य करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांवर कारवाई करणं सुरू केलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) इंग्लंड आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासांवर हल्ला करणाऱ्या १५ खलिस्तानींची ओळख पटवली आहे. शिख फॉर जस्टिसचा सदस्य हरदीपसिंग निज्जर याची या वर्षी कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संतप्त खलिस्तानींनी परदेशातील भारतीय दूतावासांना लक्ष्य केलं होतं.

हल्ले केव्हा झाले : या वर्षी २ जुलै रोजी खलिस्तानी समर्थकांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाच्या इमारतीत घुसून आग लावली होती. सुदैवानं या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय १९ मार्च रोजी ४५ खलिस्तान समर्थकांनी इंग्लंडमधील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. केंद्रातील मोदी सरकारनं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता.

एनआयएची टीम कॅनडाला जाणार : एनआयएनं हल्ला करणाऱ्या १५ खलिस्तानी समर्थकांची ओळख पटवली असल्याचं समजतं. या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणेचं एक पथक पुढील महिन्यात कॅनडाला जाणार आहे. ही टीम सर्व खलिस्तानी समर्थकांची ओळख पटवून स्थानिक सरकारशी संवाद साधून हल्लेखोरांविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करेल.

इंग्लंड आणि अमेरिकेलाही एनआयएचं पथक : यापूर्वी एनआयएचं पथक भारतीय दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांच्या तपासासाठी इंग्लंड आणि अमेरिकेला गेलं होतं. तेथे त्यांनी हल्ला करणाऱ्या खलिस्तान समर्थकांची ओळख पटवली. यानंतर तपास यंत्रणेचं पथक भारतात परतलं. त्यानंतर त्यांनी भारतीय दूतावासावरील हल्ल्याचे पाच व्हिडिओ जारी केले होते.

हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या : खलिस्तान समर्थक नेता हरदीपसिंग निज्जर याची १९ जून रोजी कॅनडामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. निज्जर हा गुरू नानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. त्याला भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलं होतं. हरदीपसिंग निज्जर याचा भारतात बंदी असलेल्या 'शिख फॉर जस्टिस' (SFJ) या फुटीरतावादी संघटनेशी संबंध होता. ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानच्या बाजूनं सार्वमत घेण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

हेही वाचा :

  1. Temple Vandalize In Canada : कॅनडात हिंदू मंदिरांची तोडफोड थांबेना; खलिस्तान समर्थकांनी आणखी एका मंदिरावर केला हल्ला
  2. Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.