ETV Bharat / bharat

Khalistan Funding : खलिस्तान समर्थकांना पाकिस्तानकडून निधी मिळतो - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान - Funding for Khalistan

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि पंजाबमधील हिंसाचारावर भाष्य केले आहे. खलिस्तान समर्थकांना पाकिस्तान आणि इतर देशांकडून निधी मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Bhagwant Mann
भगवंत मान
author img

By

Published : Feb 27, 2023, 2:17 PM IST

भावनगर (गुजरात) : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रविवारी म्हणाले की, खलिस्तान समर्थकांना पाकिस्तान आणि इतर देशांकडून निधी मिळतो आहे. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांनी राज्यात अलीकडे केलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

'खलिस्तानला मोजक्याच लोकांचे समर्थन' : गुजरातमधील भावनगर शहरात एका सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भगवंत मान म्हणाले की, 'पंजाब पोलिस हा मुद्दा हाताळण्यास पूर्ण सक्षम आहेत. पंजाबमधील खलिस्तान समर्थक चळवळीला फक्त काही मोजकेच लोक समर्थन देत आहेत. 1,000 लोक जे खलिस्तान समर्थक घोषणा देताना दिसले आहेत ते संपूर्ण पंजाबचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तुम्ही पंजाबमध्ये या आणि स्वतःच बघा की असे नारे कोण देत आहेत'.

'खलिस्तानींचे मास्टर्स पाकिस्तानमध्ये आहेत' : 'या हिंसाचारामागे काही मोजकेच लोक आहेत आणि ते पाकिस्तान आणि इतर परदेशातून आलेल्या निधीतून त्यांची दुकाने चालवतात', असे मान म्हणाले. 'राजस्थानची पाकिस्तानशी बरीच मोठी सीमा लागून आहे. असे असूनही पाकिस्तानमधून पाठवलेले ड्रोन पंजाबमध्ये का उतरतात? ते राजस्थानमध्ये का जात नाहीत? कारण खलिस्तानींचे मास्टर्स पाकिस्तानमध्ये बसले आहेत आणि त्यांना पंजाबला त्रास द्यायचा आहे. पण आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही', असे भगवंत मान म्हणाले.

'आता हिंसाचार होणार नाही' : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह आणि त्याच्या समर्थकांनी अमृतसरच्या बाहेरील अजनाळा येथील पोलीस ठाण्यात गुरु ग्रंथ साहिबची प्रत आणल्याचा उल्लेख करून मान म्हणाले की, ज्यांनी शीखांचा पवित्र ग्रंथ पोलीस ठाण्यात ढाल म्हणून नेला ते स्वत:ला पंजाबचे 'वारीस' म्हणवून घेऊ शकत नाहीत. भगवंत मान यांनी ही घटना किरकोळ असल्याचे म्हटले आहे. मान यांनी त्यांच्या आगामी काळात आणखी हिंसाचार होण्याची भीती नाकारली आहे.

'पंजाबमध्ये उद्योग येत आहेत' : 'पंजाबने यापूर्वीही असे काळे दिवस पाहिले आहेत. पंजाब पोलीस त्यांना हाताळण्यास सक्षम आहेत आणि आम्ही कोणालाही राज्यातील शांततापूर्ण वातावरणात ढवळाढवळ करू देणार नाही, असे ते म्हणाले. मान पुढे म्हणाले की, 'पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारमुळे टाटा स्टील आणि इतर देशांतील संस्थांसह अनेक उद्योग येत आहेत. पंजाबची परिस्थिती खरंच वाईट असती तर आज हे सर्व उद्योग पंजाबमध्ये आले नसते. अनिवासी भारतीयही राज्यात वापस येत आहेत. तसेच ज्यांनी परदेशात स्थायिक होण्याची योजना आखली होती ते देखील आता आपली योजना रद्द करत आहेत'.

'आम्ही ईडीला घाबरत नाही' : पंजाब लवकरच ड्रग्जमुक्त बनणार आहे कारण आम्ही तरुणांना नोकऱ्या देत आहोत. शिवाय, उद्योग देखील अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करतील. तरुणांना एकदा काम मिळाले की ते त्या वाईट सवयींचा आश्रय घेणार नाहीत, असे मान म्हणाले. दिल्ली उत्पादन शुल्क पोलिस प्रकरणात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची केलेल्या चौकशीवरून त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. 'देशातील राजभवनाला भाजप मुख्यालयाचे स्वरुप येत आहे. आणि हे राज्यपाल भाजपच्या प्रचारकांप्रमाणे वागत आहेत. लोकशाहीत निवडून आलेले लोकच निर्णय घेतात. आम्हाला कसे लढायचे हे माहित आहे आणि आम्ही सीबीआय आणि ईडीला घाबरत नाही. मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यास आम्ही माघार घेऊ, असा त्यांचा समज असेल तर ते चुकीचे आहेत', असे मान म्हणाले.

हेही वाचा : Khalistan In Punjab : पंजाबमध्ये 1980 च्या दशकाची पुनरावृत्ती? वेळीच पावले न उचलल्यास पुन्हा पेटेल पंजाब!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.