भोपाळ (मध्य प्रदेश)- खंडवा लोकसभेची पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी विजय मिळविला आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी सुरुवातीला 54,547 मतांची आघाडी घेतली होती.
मध्यप्रदेशमधील तीन विधानसभा आणि लोकसभेची मतगणना झाली. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील हे मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचले होता. भाजपचे नेते ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांची मेहनत पाहात भाजप ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला होता. ते म्हणाले, की काँग्रेस पक्ष संपणार आहे. काँग्रेसचे मुंगेरीलाल हे गोड स्वप्ने पाहत आहेत. संपूर्ण लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांची जादू सुरू आहे. पुन्हा एकदा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार आहे, असे त्यांनी मतमोजणी करताना म्हटले होते.
हेही वाचा-वोकल फॉर लोकल : 400 वर्षे पूर्वीची फटाके बनवण्याच्या पद्धतीचे पुनरुज्जीवन
हेही वाचा-गाझीपूरमध्ये भीषण अपघात : ट्रकने 6 जणांना चिरडले, 4 जण जागीच ठार
हेही वाचा-दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी