ETV Bharat / bharat

VIDEO : निर्दयीपणा! श्वानाला गाडीला बांधून फरफटत नेलं - कुत्रा

माणसांमधली माणुसकी संपत चालली आहे का, अशी शंका यावी अशी घटना केरळमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने श्वानाला आपल्या स्कुटीच्या मागे बांधले आणि तीन किलोमीटर फरफटत नेले. श्वानाला फरफटत नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्वान
श्वान
author img

By

Published : Apr 18, 2021, 7:21 PM IST

कोची - काही माथेफिरू लोकांनी प्राण्यांवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ व फोटोज् व्हायरल होत असतात. अश्या अत्याचारामुळे त्या प्राण्यांचा जीव जातो अथवा त्याला गंभीर दुखापत होते. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने श्वानाला आपल्या स्कुटीच्या मागे बांधले आणि तीन किलोमीटर फरफटत नेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी ही संपूर्ण घटना त्यांच्या कॅमऱ्यात कैद केली.

श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेले

श्वानाला फरफटत नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्वानाच्या मालकाने हे लज्जास्पद कृत्य केले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एडकारा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मालकाला अटक केली. या व्यक्तीचे नाव झेवियर (वय 40) असे आहे. श्वानाला निलांबूर येथे नेण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये संताप आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे. एखाद्या व्यक्तीने श्वानाशी इतक्या क्रूरतेने वागण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत. यापूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. एका माथेफिरुने श्वानाला आपल्या चारचाकी गाडीच्या मागे बांधले आणि पूर्ण शहरभर फरफटत नेले होते.

हेही वाचा - कर्नाटक : सहा बेपत्ता मच्छिमारांचा आयएनएस निरीक्षककडून शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.