तिरुअनंतपूरम: बसस्टॉपच्या आत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ( Kerala engineering students ) असे काही फोटोशूट केलेले त्यामुळे केरळमध्ये गदारोळ उठला आहे. स्थानिक रहिवाशांच्या एका संघटनेच्या नैतिक पोलिसिंगचा निषेध करण्यासाठी मुलींनी मुलांच्या मांडीवर बसून फोटो काढून ते व्हायरल केले. त्यामुळे हा विषय केरळमध्ये चर्चेचा बनला आहे. भाजपचे राज्य समिती सदस्य चेरुवक्कल जयन यांच्या नेतृत्वाखाली निवासी संघटनेच्या सदस्यांनी बसस्टॉपवर बसण्यासाठी लावलेले आडवे लोखंडी बार तीन ठिकाणी कापून टाकले. मुला-मुलींना एकत्र बसू नये म्हणून त्यांनी असे केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना ते पटलेले नाही. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या नैतिक पोलिसिंगला विरोध केला आणि 'तुम्हाला आमच्या एकत्र बसण्यात समस्या आहे' अशी टॅगलाइन असलेले फोटोशूट केले.
नागरिकांचे समर्थन - अनेक लोकांनी विद्यार्थ्यांच्या या फोटोशूटला पाठिंबा दर्शविला आहे. तर नैतिक पोलिसिंगच्या करणाऱ्यांनी मात्र त्याला जोरदार विरोध केला आहे. जेव्हा ईटीव्ही भारतने विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, स्थानिक लोकांकडून विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो आणि नेहमीच त्यांना नैतिक धडे देण्याचा प्रयत्न केला जातो. एका विद्यार्थिनीने सांगितले की, दुकानदार सुद्धा विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी त्यांच्या वसतिगृहात परत जाण्याचे आदेश देत असत आणि अश्लील टिप्पण्या देऊन त्यांचा छळ करत असत.
स्थानिक जनता त्रस्त - विद्यार्थ्यांच्या 'वर्तणूक'मुळे स्थानिक जनता त्रस्त झाल्याचे निवासी संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, मुली आणि मुलं बस स्टॉपवर बसलेल्या बाकावर आडवी पडायची, असंही तो म्हणायचा. त्यांनी त्यांची कृती नैतिक पोलिसिंग म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि कोविड प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी सीटचा आकार तीन सिंगल सीटमध्ये बदलल्याचे विचित्र कारणही दिले.