ETV Bharat / bharat

केरळ विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदान आणि निकाल कधी? - केरळ विधानसभा निवडणूक अपडेट

केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिल 2021 मतदान होईल.सध्या केरळात माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे.

केरळ
केरळ
author img

By

Published : Feb 26, 2021, 10:46 PM IST

तिरुअनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिल 2021 मतदान होईल. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. 2021 मध्ये 140 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पाय रोवण्याचा प्रयत्न करेल.

mbly Elections 2021
ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घ्या कधी मतदान...

सध्या केरळात माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी विजययात्रेचे आयोजन केले आहे. केरळमधील डावी आघाडी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांपुढे भाजपाने आव्हान उभे केले आहे.

‘मेट्रोमॅन’ नावने प्रसिद्ध पावलेले ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशभरात त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांचा फायदा भाजपाला होईल, असे दिसते. डाव्या आघाडीविरोधात भाजपा, कोरोना महामारीतील अपयश, ‘लव्ह जिहाद’ आणि शबरीमला हे मुद्दे उपस्थित करू शकते. एकूणच भारतीय जनता पक्षाच्या या विजययात्रेमुळे केरळचे राजकारण ढवळून निघणार आहे.

मागील निवडणूकीतील संख्याबळ -

केरळ विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एलडीएफने (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)91 जागांवर विजय मिळवला होता. यूडीएफने (संयुक्त लोकशाही आघाडी) 47 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपने एकूण 98 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.