मुंबई - कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात आता झिका विषाणूच्या संसर्गाने केरळमध्ये डोके वर काढले आहे. यामुळे चिंतेत भर पडली आहे.
केरळमध्ये मागील आठवड्यात झिका विषाणूचे तब्बल १९ रुग्ण आढळले आहेत. यात २४ वर्षांच्या एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. आता यात आणखी ४ रुग्णांची भर पडली आहे.
हेही वाचा -सूरत : जामिनानंतर दारूमाफियाने काढली महागड्या गाड्यांची रॅली; व्हिडिओ व्हायरल
तिरुवनंतपुरममध्ये सापडलेल्या चार नव्या रुग्णांमध्ये एका १६ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या नव्या रुग्णासह एकूण रुग्णसंख्या २३ वर पोहोचली आहे, याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली.
केरळ राज्यात झिका विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिंतेत भर पडली आहे. या विषाणूच्या संसर्गाच्या वृत्तामुळे आजूबाजूच्या राज्यांसह अनेक राज्यांत अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. भारतात मे २०१७ मध्ये अहमदाबादमध्ये तीन, जुलै २०१७ मध्ये तमिळनाडूत एक, तर २०१८ मध्ये राजस्थानात झिका विषाणूच्या ८० केसेस सापडल्या होत्या.
हेही वाचा - शरद पवारांसोबत गुप्तगू सुरु असतानाच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची घेतली भेट
झिका विषाणूबद्दल...
ब्राझीलमधील माकडांमध्येही झिका आणि चिकनगुनिया विषाणू आढळले आहेत. सुरूवातीला माणसातून हा संसर्ग माकडांना झाला होता. त्यामुळे अनेक माकडिणींचा गर्भपात करावा लागला होता. एडीस जातीच्या डासांपासून हा विषाणू पसरतो. माकडांना चावलेले डास माणसांनाही चावले की हा विषाणू पसरू शकतो.
ही आहेत झिका विषाणूची लक्षणे...
कोरोना संसर्गाप्रमाणेच झिकाचा संसर्ग झालेल्या अनेकांना कोणतंच लक्षण दिसत नाही. काही जणांना सौम्य लक्षणं दिसतात. त्यात डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, स्नायूदुखी, डोळे लाल होणं, त्वचेवर रॅशेस येणं आदी लक्षणांचा समावेश आहे.
हेही वाचा - यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल
हेही वाचा - देशात पहिल्यांदाच... 205 क्राईम सीन ऑफ क्राईम ऑफिसरची कर्नाटमध्ये होणार नियुक्ती