ETV Bharat / bharat

Farooq Abdullah : 'हर घर तिरंगा' मोहिमेवर फारूक अब्दुल्ला चिडले.. म्हणाले, 'तिरंगा तुमच्याच घरात ठेवा' - Farooq Abdullah On Har Ghar Tiranga

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने 15 ऑगस्ट रोजी 'हर घर तिरंगा' अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला ( Har Ghar Tiranga in kashmir ) आहे. याअंतर्गत लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेवर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला चिडले असून, 'तिरंगा तुमच्याच घरात ठेवा', असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं ( Farooq Abdullah On Har Ghar Tiranga ) आहे.

Farooq Abdullah
फारूक अब्दुल्ला
author img

By

Published : Jul 7, 2022, 8:39 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी घराघरात तिरंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे. बुधवारी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एका पत्रकाराने त्यांना केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेबद्दल ( Har Ghar Tiranga in kashmir ) प्रश्न विचारला. पत्रकाराच्या प्रश्नावर फारुख अब्दुल्ला यांनी, 'तुझ्याच घरात ठेव', अशी प्रतिक्रिया दिली. जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण विभागाने एक आदेश जारी करून 'हर घर तिरंगा' मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले ( Farooq Abdullah On Har Ghar Tiranga ) आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल : अब्दुल्लांच्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फारुख अब्दुल्ला श्रीनगरच्या बाजारपेठेत एका दुकानात पोहोचले होते. येथून निघताना त्यांना पत्रकारांनी घेरले. प्रथम त्यांना यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना फारुख म्हणाले की, यशवंत सिन्हा 9 जुलैला काश्मीरला येत आहेत. त्यांच्या आगमनानंतर पत्रकार परिषद होणार आहे.

मेहबूबा मुफ्ती यांनीही तिरंग्याबाबत वक्तव्य केले होते : काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए मध्ये बदल करण्यापूर्वी पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही एकदा तिरंग्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, एवढ्या संकटानंतरही इथले लोक भारताचा ध्वज हातात धरतात, पण काश्मीरमधून कलम 35A हटवले तर इथे तिरंग्याला खांदा देणारा कोणीही नसेल.

केंद्राची 'हर घर तिरंगा' मोहीम काय आहे? : केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १५ ऑगस्टला ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ केंद्र सरकार स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत लोकांना घरोघरी आणि संस्थांमध्ये राष्ट्रध्वजाची पूजा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांना संपूर्ण कुटुंबासह राष्ट्रीय सण साजरा करण्यास सांगण्यात आले आहे.

यूपीएच्या पहिल्या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांना यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, यावर बराच विचार केल्यानंतर मला विश्वास आहे की, जम्मू-काश्मीर सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. ज्याला सामोरे जाण्यासाठी माझ्या मदतीची गरज आहे. म्हणूनच मी माझे नाव आदराने मागे घेत आहे. मी ममता दीदींचा आभारी आहे की त्यांनी माझे नाव सुचवले आणि ज्या नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांची ११.८६ कोटींची मालमत्ता जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.