नवी दिल्ली : भारत राष्ट्र समितीच्या राष्ट्रीय कार्यालयाचे (BRS national office) देशाची राजधानी दिल्लीत उद्घाटन करण्यात आले. (BRS national office inaugurate in Delhi). पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सरदार पटेल रोडवरील या कार्यालयाचे उद्घाटन केले. (KCR inaugurate BRS national office). प्रथम तेथे राजश्यामला व नवचंडी यज्ञ केला गेला. यावेळी केसीआर, त्यांची पत्नी शोभा, आमदार कविता यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार, एमएलसी आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.
अखिलेश यादव आणि कुमारस्वामी प्रमुख पाहुणे : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि जेडीएस नेते कुमारस्वामी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर केसीआर यांनी ध्वजाचे अनावरण केले. मंत्री केटीआर हे देखील कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी आज सकाळी दिल्लीला पोहोचणार होते, मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विशेष परवानगीने येऊ शकत नसल्याचा खुलासा केला. दोन महत्त्वाच्या पूर्वनियोजित बैठकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.