ETV Bharat / bharat

गोदामात मक्याच्या पोत्यांखाली 10 हून अधिक कामगार अडकले, 3 जणांचे मृतदेह बाहेर काढले

author img

By ANI

Published : Dec 5, 2023, 10:43 AM IST

Updated : Dec 5, 2023, 12:45 PM IST

Karnataka News : कर्नाटकातील विजयपुरा येथील राजगुरु इंडस्ट्रीज येथे स्टोरेज युनिट कोसळल्यानं मक्याच्या पोत्यांखाली 10 हून अधिक कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे. अडकलेल्या कामकारांपैकी तिघांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

karnataka vijayapura over 10 workers trapped under maize bags in warehouse
कर्णाटकातील विजयपुरा येथे मक्याच्या पोत्याखाली 10 हून अधिक कामगार अडकले

विजयपुरा (कर्नाटक) Karnataka News : कर्नाटकातील विजयपुरा येथील एका खासगी गोदामात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री बिहारमधील 10 हून अधिक कामगार मक्यानं भरलेल्या पोत्यांखाली अडकले आहेत. यापैकी सात कामगारांचा मृत्यू झाला असून घटनास्थळावरून तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापूर्वी अडकलेल्या कामगारांपैकी तिघांची सुटका करण्यात आली होती. तसंच त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान, राजगुरू इंडस्ट्रीज येथे अन्न प्रक्रिया युनिटमध्ये कामगार काम करत असताना ही घटना घडली. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हा अत्यंत दुर्दैवी अपघात आहे. या घटनेत बिहारमधील सात कामगारांचा मृत्यू झालाय. इतर अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलंय- एम बी पाटील, मंत्री, कर्नाटक

कर्नाटकचे मंत्री घटनास्थळी दाखल : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मक्याचे पोते असलेल्या स्टोरेज युनिटचे अनेक संच कोसळल्यानं कामगार अडकले होते. राजेश मुखिया (25), रामब्रीझ मुखिया (29) आणि शंभू मुखिया (26) अशी मृत कामगारांची नावं असून कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मंत्री एमय बीय पाटील हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

बचावकार्य सुरू : सदरील घटनेसंदर्भात माहिती मिळताच एसपी ऋषिकेश सोननवन यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसंच अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या जवानांच्या सहकार्यानं सध्या बचावकार्य सुरू असून बचावकार्य करण्यासाठी क्रेन आणि अर्थ मूव्हर्स देखील आणण्यात आले आहेत.

10-12 कामगार अजूनही अडकलेलेच : याप्रकरणी अधिक माहिती देत विजयपुराचे पोलीस उपायुक्त टी भूबलन म्हणाले की, राजगुरु इंडस्ट्रीज या खाजगी अन्न प्रक्रिया युनिटमध्ये काही कामगार मक्याच्या पोत्यांखाली अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली. बचावकार्य सुरू आहे. सुमारे 10-12 कामगार अजूनही अडकले असण्याची शक्यता आहे, तर तीन कामगारांची सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Donate Land To School : ६८ वर्षीय महिलेनं शाळेसाठी दान केली जमीन! तेथेच स्वयंपाकी म्हणून करते काम
  2. Maharashtra Karnataka Border Dispute : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्यानं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
  3. Cauvery River Water Dispute : कावेरी नदीच्या पाण्याचा प्रश्न पेटलं; सगळ्यांनांच हवाय नदीच्या पाण्याचा स्त्रोत

Last Updated : Dec 5, 2023, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.