ETV Bharat / bharat

Karnataka New CM : सिद्धरामैय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी शिवकुमार; 20 तारखेला शपथविधी सोहळा - सिद्धरामैय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी व उपमुख्यमंत्री पदी कोण असणार आहे, याची अधिकृत माहिती काँग्रेसच्या राष्ट्रीय नेते केसी वेणुगोपाल व रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटल्याचे स्पष्ट आहे. नवीन सरकारचा शपथविधी २० मे रोजी होणार आहे.

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री पदी निवड
Karnataka New CM
author img

By

Published : May 18, 2023, 12:58 PM IST

Updated : May 18, 2023, 6:41 PM IST

नवी दिल्ली- सिद्धरामैय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत केली. या सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद शिवकुमार यांच्याकडेच असणार आहे. उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचा २० मे रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.

केपीसीसीचे अध्यक्षपद शिवकुमार यांच्याकडे राहणार : कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आणि एआयसीसी सचिव केसी वेणुगोपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. डीके शिवकुमार हे संसदीय निवडणुका संपेपर्यंत कर्नाटकच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 मे रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्यासाठी समविचारी पक्षांच्या लोकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमची एकजूट आहे-शिवकुमारकर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची निवड झाल्याची घोषणा झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांचे मन वळवण्यात काँग्रेस हायकमांडला अखेर यश आले आहे. काँग्रेस हायकमांडने काही अटींवर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत कलह मिटविला आहे.

कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि लोकांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याची खात्री करण्यासाठी आमची एकजूट आहे-डीके शिवकुमार

दोन्ही गटाकडून सुरू होते लॉबिंग-कर्नाटकातील जनतेला विकास, कल्याण आणि सामाजिक न्याय देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. राज्यातील 6.5 कोटी कन्नडिगांना दिलेल्या 5 आश्वासनांची पूर्तता करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकून बहुतम मिळविले आहे. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. एका गटाने सिद्धरामय्या मुख्यमंत्री व्हावेत असा आग्रह धरला होता. तर दुसऱ्या गटाने डीके शिवकुमार यांच्यासाठी लॉबिंग केले होते.

हेही वाचा-

  1. Karnataka New CM Siddaramaiah: कधीकाळी जनता दलाचे नेते ते काँग्रेसमधील तत्वनिष्ठ नेते सिद्धरामय्या, असा आहे कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा प्रवासSiddaramaiah Elected
  2. As New CM : कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला; अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ
  3. SC verdict on Jallikattu bullock cart: हुर्रे.. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी, शर्यती घेण्याचा मार्ग मोकळा

Last Updated : May 18, 2023, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.